शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी व्हेंटिलेटर्सवर खासगी हॉस्पिटल्सची नफेखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाचे संकट कमी व्हावे, यासाठी शासनाने पहिल्या लाटेत आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी दिलेले व्हेंटिलेटर्स जिल्हा प्रशासनाने खासगी ...

औरंगाबाद : कोरोनाचे संकट कमी व्हावे, यासाठी शासनाने पहिल्या लाटेत आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी दिलेले व्हेंटिलेटर्स जिल्हा प्रशासनाने खासगी हॉस्पिटल्सना देऊन टाकले. जून २०२० मध्ये केंद्र शासनाने दिलेले व्हेंटिलेटर्सवर गरजू रुग्णांवर उपचार झाले की, खासगी हॉस्पिटल्सनी नफेखोरी केली, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान साहाय्यता निधीतून एप्रिल २०२१ मध्ये आलेल्या व्हेंटिलेटर्सवरून किती गरजूंवर उपचार सुरू आहेत, या व्हेंटिलेटरवरून उपचार करणाऱ्यांकडून बिलात रक्कम लावल्याच्या तक्रारी देखील वारंवार येत आहेत. त्यामुळे प्रशासन ऑडिट कधी सुरू करणार, याकडे लक्ष आहे.

२७ एप्रिल, १ मे आणि १० मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने शहरातील खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी २७ एप्रिल रोजी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला ५, एमजीएम हॉस्पिटलला २० असे २५ व्हेंटिलेटर्स दिले. यानंतर १ मे रोजी पॅसिफिक हॉस्पिटलला ३ आणि एचएमजी हॉस्पिटलला ३ व्हेंटिलेटर्स त्यांनी दिले. १० मे रोजी पॅसिफिक हॉस्पिटलला १० नग देण्यात आले. सरकारी व्हेंटिलेटरवरून खरेच गरजूंना उपचार मिळतो आहे काय, रुग्णांकडून पैसे घेतले जात नाहीत ना? याचे ऑडिट (परीक्षण) कोण करणार, असा प्रश्न आहे. शासनाकडून आलेले व्हेंटिलेटर्स देताना घाटी तसेच जिल्हा रुग्णालयास प्राधान्य देण्यात यावे, खासगीऐवजी शासकीय हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिलेटर सुविधा देण्याचा विचार करण्यात यावा, खासगी हॉस्पिटल्सना दिलेले व्हेंटिलेटर्स काढून घेण्यात यावेत, अशी मागणी वारंवार होत गेली, मात्र सरकारी व्हेंटिलेटर्स खासगी हॉस्पिटल्सला देण्याचा सपाटा सुरूच आहे.

व्हेंटिलेटरवर कुणाचे उपचार केले...

गेल्यावर्षी पहिल्या लाटेमध्ये केंद्र शासनाने ६५ व्हेंटिलेटर्स औरंगाबादसाठी पाठविले होते. त्यातून सावंगीकर हॉस्पिटल २, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल २, एमजीएम हॉस्पिटल १०, अ‍ॅपेक्स हॉस्पिटल २, माणिक हॉस्पिटल ३, वायएसके हॉस्पिटल ३, असे २४ व्हेंटिलेटर्स तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले. त्या व्हेंटिलेटर्सवर ज्या रुग्णांचे उपचार केले, त्यांना बिल आकारण्यात येऊ नये, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. चौधरी यांची बदली झाल्यानंतर, त्यातून किती गरजू रुग्णांवर उपचार झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

...तर निश्चितपणे कारवाई होईल

याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले, शासनाकडून आलेले व्हेंटिलेटर्स ज्या रुग्णांसाठी वापरले, त्यांच्याकडून बिल घ्यायचे नाही, या तत्त्वावर ते दिले आहेत. जर बिल आकारल्याचे आढळले, तर कारवाई निश्चितपणे केली जाईल. १० खाटांचे हॉस्पिटल, ४ व्हेंटिलेटर्स बेड असतील, तर पहिले तीन सरकारी व्हेंटिलेटर्स वापरण्याच्या सूचना आहेत. परंतु अनेक ठिकाणी या पध्दतीने वापर झाला आहे की नाही, याची माहिती संकलित करून ऑडिट करण्यात येईल. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात अनेक खासगी हॉस्पिटल्सना व्हेंटिलेटर्स दिले आहेत. सर्वंकष माहिती घेऊन ऑडिट करू.