औरंगाबाद : प्राध्यापक, साहित्यिकांचा सहभाग असलेल्या लोकसंवाद फाउंडेशन आणि पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे इटखेडा परिसरातील नाथपुरम सांस्कृतिक सभागृहात रविवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते १ या वेळेत झालेल्या शिबिरात ४५ दात्यांनी रक्तदान करीत रक्ताचे नाते अधिक घट्ट करण्यास प्राधान्य दिले.
इटखेडा येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घोडेले यांनी 'लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमाचे कौतुक करीत, सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या उपक्रमात सहभाग नोंदविता आल्याचा आनंद व्यक्त केला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे म्हणाले, 'लोकमत'सोबत असा सामाजिक उपक्रम घेता आला याचा आनंद आहे. यापुढेही सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होण्यास आमची फाउंडेशन पुढे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कथाकार डॉ. हंसराज जाधव यांच्यापासून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. यानंतर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे, सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, सुदाम मुळे पाटील, प्रा. रविकिरण सावंत, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, प्रा. बंडू सोमवंशी, डॉ. प्रभाकर कुटे, डॉ. कडुबा काेकरे, प्रा. मोहन निकम, डॉ. गणेश बडे, डॉ. संदीप, आदींनी रक्तदान करीत अनेकांचा उत्साह वाढविला. पैठण येथील प्रतिष्ठा महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे कॅप्टन डॉ. अर्जुन मोरे यांच्या नेतृत्वात ३७ एनसीसी कडेट्स रक्तदान करण्यासाठी आली होते. त्यापैकी नियमात बसणाऱ्या २५ विद्यार्थ्यांचे रक्तदान झाले. या रक्तदान शिबिरात डॉ. राजेप करपे आणि रेणुका करपे, सुदाम मुळे पाटील आणि रूपाली मुळे या दाम्पत्यांनी रक्तदान केले. दुपारी एक वाजता रक्तदान शिबिराचा समारोप झाला. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव डॉ. गणेश मोहिते, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, उपाध्यक्ष डॉ. कैलाश अंभुरे, सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. विश्वनाथ कोक्कर, श्रीनिवास वाघ, सुनील ढिलपे, लक्ष्मीकांत देशमुख, आदींनी परिश्रम घेतले.
घाटी रुग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे डॉ. सिम्मी मिन्स, डॉ. प्रियंका विभूते, डॉ. ज्योती हाके, हनुमान रुळे, शुभांगी कटारे, प्रतीक्षा गायकवाड, मनोज पंडित, अली चाऊस, बबन वाघ, मजहर शेख यांनी सहकार्य केले.