शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणात तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:20 IST

लिंक रोड ते पैठणपर्यंतच्या चौपदरीकरणात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान व भविष्यात होणाºया समांतर जलवाहिनीची अडचण येणार आहे. २५ कि़मी. परिसरात जलवाहिनी चौपदरीकरणासाठी अडसर ठरणार असून, त्याबाबत तातडीने तोडगा निघाला, तर त्या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम मार्गी लागेल आणि रस्त्याच्या कामासाठी पुढील प्रक्रिया करणे सोपे होईल, असे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिंक रोड ते पैठणपर्यंतच्या चौपदरीकरणात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान व भविष्यात होणाºया समांतर जलवाहिनीची अडचण येणार आहे. २५ कि़मी. परिसरात जलवाहिनी चौपदरीकरणासाठी अडसर ठरणार असून, त्याबाबत तातडीने तोडगा निघाला, तर त्या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम मार्गी लागेल आणि रस्त्याच्या कामासाठी पुढील प्रक्रिया करणे सोपे होईल, असे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत सांगितले. याप्रकरणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मनपाला रस्त्याचे चौपदरीकरण गृहीत धरून जलवाहिनी टाकण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.औरंगाबाद ते पैठण या रस्त्यासाठी चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी भारतमाला योजनेत घेतला आहे. त्यानुसार रस्त्याच्या डीपीआरचे काम दीड वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले; परंतु २५ कि़मी.च्या अंतरातील डीपीआरचे काम ठप्प आहे. त्या रस्त्यामध्ये शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी २० ते २५ कि़मी.च्या अंतरात आहे. त्याच भागातून समांतर जलवाहिनीचे नियोजन आहे. ती जलवाहिनी टाकण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाची एनओसी घेण्यात यावी. रस्त्याच्या डीपीआरचे काम होत आले आहे. जुन्या जलवाहिन्या समांतरचे काम करताना काढून टाकण्यात येतील का? असा प्रश्न एनएचएआयने मनपाला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केला. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी बैठकीत सांगितले, जुन्या जलवाहिनी काढण्यात येणार नाहीत. नक्षत्रवाडी ते शहर ही जलवाहिनी बंद होईल. ती ७०० मि.मी.ची जलवाहिनी आहे, तर १४०० मि.मी.ची जलवाहिनी सुरू राहील.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad transportरस्ते वाहतूक