शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या मिनी घाटीचे खाजगीकरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:19 IST

जालना रोडवरील, चिकलठाणा परिसरातील मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) म्हणून बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देधोरण निश्चितीसाठी समिती : विकास मंडळ सदस्याचे राज्यपालांना पत्र

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोडवरील, चिकलठाणा परिसरातील मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) म्हणून बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे. राज्यातील २०० बेड्सपेक्षा जास्त क्षमता असलेल्या सरकारी रुग्णालयांच्या खाजगीकरणाचा विचार शासन दरबारी सुरू असून, त्यामध्ये यामिनी घाटी रुग्णालयाचा विचार करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.२५ कोटी रुपयांच्या आसपास मिनी घाटीवर खर्च झाला असून, ३८ कोटींचे बजेट त्यासाठी मंजूर झाले आहे. सध्या तेथे वैद्यकीय मशिनरी आलेली नाही. सिटीस्कॅन बाहेरून करून घेण्याचा विचार सुरू आहे. बेड्सदेखील तेथे आलेले नाहीत. पाणीपुरवठ्याचा मुद्दाही सध्या बाजूला पडलेला आहे. त्यातच दोन वर्षांपासून त्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. खाजगीकरणाच्या हालचालींमुळेच त्याचे उद्घाटन व यंत्रखरेदी लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे.मिनी घाटीचे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण झाले. २०१५ पासून ते रुग्णसेवेत अर्पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घाटीवरील रुग्णभार कमी करण्यासाठी मिनी घाटीचे बांधकाम केले. मेडिसिन, प्रसूती, सर्जरी, अपघात विभागाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे; परंतु त्याचे उद्घाटनच रखडले आहे. सध्या १ मे रोजी उद्घाटन होईल, अशी चर्चा आहे. याप्रकरणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.खाजगीकरणाची कारणे अशीशासकीय सेवेत डॉक्टर येण्यास तयार नाहीत. जे डॉक्टर आहेत त्यातील काही जण खाजगी प्रॅक्टिससुद्धा करतात. सरकारी रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री उपलब्ध नाही. रुग्णालयात औषधी उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील २०० बेड्सहून अधिक रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयांचे खाजगीकरण करण्याचा विचार पुढे आला आहे. यावर समितीच्या अहवालानंतर सरकार निर्णय घेणार आहे.खाजगीकरणासाठी समितीसरकारी रुग्णालय व मेडिकल कॉलेजचे धोरण निश्चितीसाठी ठरविण्यात आलेल्या समितीमध्ये राज्य आरोग्य सेवा अभियान विभागाचे आयुक्त, आरोग्य विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. ही समिती राज्यातील २०० बेड्सहून अधिक रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयांच्या खाजगीकरणाबाबत शासनाला तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर रुग्णालयांच्या खाजगीकरणाचा निर्णय होईल. गुजरातमध्ये अदानी एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनकडून सरकारी रुग्णालये व मेडिकल कॉलेज चालविण्यात येत आहेत. त्या सरकारने फाऊंडेशनसोबत एमओयू केलेला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालय व महाविद्यालयांच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे.मराठवाडा विकास मंडळाचा विरोधमराठवाडा विकास मंडळ सदस्यांनी शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. सरकारचे हे धोरण जनतेविरोधी असल्याचे पत्र सदस्यांनी राज्यपालांना पाठविले आहे. हे धोरण रद्द करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.मराठवाड्यासह राज्यातील २०० खाटांपेक्षा जास्त रुग्णक्षमता असलेली सरकारी रुग्णालये खाजगी संस्था, कंपन्यांच्या हाती देण्याचे जवळपास निश्चित झाल्यासारखे वाटते आहे.हा निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हिताचा नाही. गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याच्या जबाबदारी व कर्तव्यातून सरकार पळ काढू पाहत आहे. सरकारी रुग्णालयांची दुरवस्था का होत आहे.तेथील भ्रष्टाचार निर्मूलनाकडे लक्ष देण्याऐवजी खाजगीकरणाचा उपाय शोधणे म्हणजे सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे, असे मंडळ सदस्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद