औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी १ हजार १० ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन), ९६० व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफियेबल पेपर आॅडिट ट्रोल) आणि ६४० सीयू (कंट्रोल युनिट) कोल्हापूर येथून जिल्हा प्रशासनाला मिळाल्या आहेत. तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या निगराणीखाली सदरील ईव्हीएम निवडणुकीसाठी आणल्या असून, त्यांची प्राथमिक तपासणी बुधवारपासून शासकीय कला महाविद्यालयाच्या अंडरग्राऊंडमध्ये सुरू करण्यात आली आहे.आचारसंहिता लागल्यानंतर प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने वेग घेतला आहे. औरंगाबाद मतदारसंघासाठी कोल्हापूरहून आलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे फर्स्ट लेव्हल चेकिंगची (एफएलसी) जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. तपासणीसाठी बंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. (बेल) चे २३ अभियंते आणि ८ लिपिकांसह ३५ मजूर आणि २ अधिकारी कार्यरत आहेत.यापूर्वी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी ईव्हीएमची तपासणी सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. त्यावेळी ३ हजार ३३९ कंट्रोल युनिट तर ५ हजार ५३२ बॅलेट युनिटची तपासणी केली होती. ईव्हीएमची तपासणी या आठवड्याच्या अखेरीस पूर्ण होईल. जिल्ह्याला निवडणुकीमध्ये ६ हजार ७०० बॅलेट युनिट, ३ हजार ८३१ कंट्रोल युनिट तर ४ हजार १४४ व्हीव्हीपॅटची आवश्यकता आहे. आवश्यकतेपेक्षा ५ टक्के अधिक ईव्हीएम जिल्हा निवडणूक विभागाकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे.हे प्रशिक्षण नाही फक्त तपासणीईव्हीएमची बुधवारी फक्त तपासणी सुरू केली आहे. त्याबाबत प्रशिक्षण दिलेले नाही. परंतु प्राथमिक तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासणी असल्यामुळे राजकीय पक्ष पदाधिकारी, प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते की नाही, याची माहिती प्रशासनाने कळविली नाही. ईव्हीएम औरंगाबादेत आल्यानंतर मंगळवारी सकाळपासून तपासणी सुरू करण्यात येणार होती. परंतु मंगळवारी रात्री ईव्हीएम औरंगाबादमध्ये दाखल झाल्यामुळे तपासणी एक दिवस पुढे ढकलली, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.--------------
कोल्हापूरहून आणलेल्या १ हजार १० ईव्हीएमची प्राथमिक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:49 IST
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी १ हजार १० ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन), ९६० व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफियेबल पेपर आॅडिट ट्रोल) आणि ...
कोल्हापूरहून आणलेल्या १ हजार १० ईव्हीएमची प्राथमिक तपासणी
ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : ९६० व्हीव्हीपॅट, ६४० कंट्रोल युनिटचा समावेश