शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सण संपताच डाळींचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:05 IST

नवीन उडीद, मठाची आवक सुरू झाली आहे. पुढील महिन्यात नवीन तूर बाजारात दाखल होणार आहे. परिणामी बाजारात मागील महिनाभरापासून डाळींचे भाव गडगडले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवीन उडीद, मठाची आवक सुरू झाली आहे. पुढील महिन्यात नवीन तूर बाजारात दाखल होणार आहे. परिणामी बाजारात मागील महिनाभरापासून डाळींचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साठेबाजांना ४ कोटींपेक्षा अधिकचा फटका बसला आहे. त्यामुळे तूर व उडदाचे भाव कमी होतील, अशी चिंता शेतकºयांमध्ये पसरली आहे.दिवाळी सणाच्या आधी डाळींचे भाव वधारलेले होते. सर्वाधिक हरभरा डाळ महाग होती. ७००० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली होती. तर उडीद डाळ ६५०० ते ७००० रुपये, तूर डाळ ५८०० ते ५९०० रुपये, मूग डाळ ६५०० ते ६७०० रुपये, मसूर डाळ ५००० ते ५२०० तर मठ डाळ ५७०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत होती. आणखी भाववाढ होईल या आशेने जिल्ह्यातील साठेबाजांनी डाळींचा साठा करून ठेवला होता. प्रत्येक साठेबाजांकडे ५ ते ७ ट्रक डाळींचा साठा असल्याचे व्यापा-यांनी सांगितले. नवीन मुगाचे उत्पादन सर्वत्र चांगले राहिले, यामुळे महिनाभरात क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांनी मूग डाळीचे भाव कमी झाले. विदर्भ, आंध्र प्रदेश व मध्यप्रदेशात उडदाचे पीक समाधानकारक झाले आहे. नवीन उडीद बाजारात आल्याने उडीद डाळीचे भाव क्विंटलमागे १ हजार रुपयांनी गडगडले आहे. सध्या ५५०० ते ६००० रुपये क्विंटलने उडीद डाळ विकली जात आहे. सर्वाधिक आर्थिक फटका उडीद डाळीमध्येच बसला आहे. राजस्थान (नोखा) येथून नवीन मठाची आवक सुरू झाली आहे. यामुळे मठ डाळ महिनाभरात ५०० ते ७०० रुपये घसरून सध्या ५००० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.नवीन मठाचे भाव ४३०० ते ४५०० रुपये क्विंटल निघाले आहेत. मागील वर्षी नवीन मठ सुरुवातीला ५ हजार रुपयांनी विक्री झाली होती. तूर, उडीद, मठ बाजारात येण्याच्या वेळीच डाळीचे भाव गडगडल्याने उत्पादक शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.