शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गॅसचे दर साडेसातशे अन् सबसीडी मिळते तीन रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:05 IST

सय्यद लाल बाजारसावंगी : एकीकडे सर्वसामान्यांच्या घरात गॅस पोहोचल्यानंतर गॅसच्या दराने आकाशपाताळ एक करीत सिक्सर मारलेला असताना, दुसरीकडे ...

सय्यद लाल

बाजारसावंगी : एकीकडे सर्वसामान्यांच्या घरात गॅस पोहोचल्यानंतर गॅसच्या दराने आकाशपाताळ एक करीत सिक्सर मारलेला असताना, दुसरीकडे ग्राहकांच्या खात्यात दिली जाणारी सबसीडी दोनशे रुपयांवरून घसरत अवघ्या तीन रुपयांवर आल्याने सर्वसामान्यांची लूट होऊ लागली आहे, तर सर्वसामान्यांचे बजेट देखील कोलमडले आहे.

दोन वर्षांपूर्वी १४ किलो वजनाच्या गॅसला पाचशे ते सहाशे रुपये दर आकारला जात असे. यात प्रत्येक तारखेस कमी-अधिक किंमत आकारली जात असे. दुसरीकडे या गॅसची ग्राहकास सबसीडी अनुदान ग्राहकांच्या खात्यात दोनशे ते तीनशे रुपये जमा केले जाते असे. नोव्हेंबर २०२० मध्ये १४ किलोच्या सिलिंडरची किंमत ६०३ रुपये होती. एक डिसेंबरला ६०३ रुपये, दोन तारखेला ६५३, तर १४ तारखेला ७०३ अशी एकाच महिन्यात तीन तीन वेळा गॅस दरात वाढ झाल्याने हा गॅस भाववाढीचा उच्चांक निर्माण केला गेला. आता गुरुवारी रात्री पुन्हा वीस रुपयांची वाढ झाल्याने आता गॅसचा दर ७२३ रुपये असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून या महिन्यापासून ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. सरकारी धोरणामुळे गॅसच्या किमतीत कधी वाढ होईल, हे सांगताच येणार नाही.

ग्राहकांची मांडली थट्टा

गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला गॅसमागे दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते. त्यामुळे सहाशे रुपयांचा गॅस हा ग्राहकांना चारशे ते साडेचारशे रुपयांना मिळत असल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा होता. परंतु डिसेंबर २०२० या एकाच महिन्यात तीनदा गॅसचे दर वाढले आहेत, तर गुरुवारी देखील वीस रुपयांची वाढ झाल्याने गॅसचे दर साडेसातशे रुपयांवर गेले. परंतु ग्राहकांना दिले जाणारे अनुदान केवळ तीन रुपये दिले जात असल्याने यात त्यांची थट्टा मांडली जात आहे. भाववाढीच्या तुलनेत सबसीडीत वाढ करण्याऐवजी घट झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.

------

गृहिणींचे बजेट कोलमडले

दीड ते दोन वर्षांपूर्वी १४ किलोचा गॅस सिलिंडर चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत होते. त्यात गेल्या दोन महिन्यात गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु त्याचप्रमाणे दिल्या जाणाऱ्या सबसीडीत मात्र घट झाली. दोनशे रुपयांची सबसीडी तीन रुपयांवर आल्याने महिन्याचे बजेट कोलमडले जाते.

- सविता अधाने, गृहिणी