शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एका खासदारांची उपस्थिती, दुसऱ्या खासदारांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:02 IST

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर शनिवारी रेल्वे प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीस डावलण्यात आल्याने एमआयएमचे खा. इम्तियाज जलील हे रेल्वे अधिकाऱ्यांवर चांगलेच ...

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर शनिवारी रेल्वे प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीस डावलण्यात आल्याने एमआयएमचे खा. इम्तियाज जलील हे रेल्वे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. रेल्वेची बैठक सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी फोनवरून रेल्वे अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत खडेबोल सुनावले.

रेल्वेस्टेशनवर भाजप खा. भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठक सुरू असतानाच रेल्वे अधिकाऱ्यांचे फोन वाजण्यास सुरुवात झाले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) उपिंदरसिंग यांचाही फोन वाजत होता. हा फोन खा. इम्तियाज जलील यांचा होता. बैठकीविषयी आपल्याला माहिती दिली नाही, याविषयी विचारणा करीत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. बैठकीनंतरही रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. बैठकीस भाजप नेते आणि कार्यकर्तेच उपस्थित होते. बैठकीचे आमंत्रण नेमके कोणी दिले, याविषयी एकमेकांकडे बोट दाखविण्यात आले.

मी काय करू : भागवत कराड

रेल्वेच्या बैठकीस खा. इम्तियाज जलील यांना बोलावले नाही, याविषयी विचारणा केली असता ‘त्यांना बोलावले नाही, तर मी काय करू,’ अशी प्रतिक्रिया खा. भागवत कराड यांनी दिली.

श्रेय घेण्यासाठीच बैठक : इम्तियाज जलील

रेल्वेची बैठक भाजपाची वाटावी, अशा पद्धतीने बैठक घेण्यात आली. डीआरएम हे सर्वांचे असतात, कोणत्या पक्षाचे नसतात; परंतु भाजप नेते, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. श्रेय घेण्यासाठीच बैठक घेण्यात आली, असे खा. इम्तियाज जलील म्हणाले.

मी पाहणीसाठी आलो : डीआरएम

बैठकीसाठी आमच्याकडून कोणाला निमंत्रण देण्यात आले नव्हते; परंतु बैठकीला कोणीही येऊ शकते, मी पाहणी करण्यासाठी आलो होतो, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) उपिंदरसिंग म्हणाले.