शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणासाठी वैद्यनाथ मंदिर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 20:18 IST

सोमवारपासून सुरु होत असलेल्या श्रावणमहिन्यात वैद्यनाथ मंदिरात येणा-या भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने सीसीटीव्ही ,खाजगी सुरक्षा व्यवस्था आदी चोख व्यवस्था ठेवली आहे.

ऑनलाईन लोकमत
 
बीड / परळी : सोमवारपासून सुरु होत असलेल्या श्रावणमहिन्यात  वैद्यनाथ मंदिरात येणा-या भाविकांची संख्या लक्षात  घेऊन प्रशासनाने सीसीटीव्ही ,खाजगी सुरक्षा व्यवस्था आदी चोख  व्यवस्था ठेवली आहे.जोतीर्लिंग क्षेत्र असल्याने श्रावण महिन्यात मंदिरात देशभरातील भाविकांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती असते. 
 
पोलिस प्रशासनाने सीसीटिव्ही कॅमेऱ्यासह विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून खाजगी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.प्रशासनाने भाविकांच्या सेवा व सुविधांसाठी तत्पर रहावे असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे. तसेच वैद्यनाथ देवस्थानने  भाविकांच्या सेवेसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदीर प्रशासन भाविकांच्या सुविधांसाठी व स्वागतासाठी सज्ज असल्याचे देवस्थानचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.
 
श्रावण महिन्याच्या निमित्ताने द्वादश ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे महिनाभर देशभरातील भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेवून आज वैद्यनाथ मंदीरात प्रशासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीस अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपाधिक्षक विशाल आनंद, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्थ अनिल तांदळे, गुरूप्रसाद देशपांडे, बाबासाहेब देशमुख, अन्न  व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभिमन्यु केरूरे पोलिस निरिक्षक हेमंत मानकर, उमाकांत कस्तुरे यांची उपस्थिती होती.