शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मातासाहेब देवांजी जन्मोत्सवाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:07 IST

मातासाहेब देवांजी यांच्या ३३६ व्या जन्मोत्सवाच्या तयारीसाठी मुगट परिसरातील ऐतिहासिक धार्मिक स्थळ असलेल्या गुरूद्वारा मातासाहेब देवांजी येथे बुधवारी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मातासाहेब देवांजी यांच्या ३३६ व्या जन्मोत्सवाच्या तयारीसाठी मुगट परिसरातील ऐतिहासिक धार्मिक स्थळ असलेल्या गुरूद्वारा मातासाहेब देवांजी येथे बुधवारी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़२ ते ४ आॅक्टोबरदरम्यान मातासाहेब गुरूद्वारा परिसरात भव्य स्वरूपात मातासाहेब देवांजी यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी विविध प्रस्तावांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, गुरूद्वारा मातासाहेब देवांजीसारख्या पवित्र पावन धार्मिक स्थळाची सेवा करण्याची शासनाला संधी लाभत आहे़ माझ्यासोबतच विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी येथे सेवा म्हणून तीन दिवस आपले कर्तव्य चोखपणे बजावणार आहेत़ हा कार्यक्रम भव्य, दिव्य स्वरूपात साजरा व्हावा आणि सर्वधर्मिय भाविकांची उपस्थिती लाभावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले़ बैठकीस गुरूद्वारा मातासाहेबचे प्रमुख जत्थेदार संतबाबा प्रेमसिंघजी, गुरूद्वारा लंगरसाहेबचे संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी कारभारी,नायब तहसीलदार संजय सोलणकर, गुरूद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगाई, जि़ प़ सदस्या अरूणा कल्याणे, भीमराव कल्याणे, गुरूद्वारा बोर्डाचे सदस्य राजेंद्रसिंघ पुजारी, गुरमितसिंघ बेदी, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, जसबीरसिंघ बुंगाई, गुलाबसिंघ असर्जनवाले, गगनदीपसिंघ जहागीरदार, रमेश गांजापूरकर, रवींद्रसिंघ मोदी यांची उपस्थिती होती़ तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.