शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

परतवारी एकादशीची तयारी अंतिम टप्यात

By admin | Updated: July 17, 2017 00:33 IST

नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी हे गाव संत नामदेव महाराजाचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे २० जुलै रोजी होणारा परतवारी सोहळा सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी हे गाव संत नामदेव महाराजाचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे २० जुलै रोजी होणारा परतवारी सोहळा सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. या निमित्ताने येथे संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी ५ ते ६ लाख भाविक येतात. नर्सी येथे महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा तर काही भाविक बाहेर देशातूनही येतात. आषाढी वारीला पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी एकादशीला नर्सी येथे संत नामदेव महाराजाचे दर्शन घेतो तेव्हाच त्यांची पंढरपूर वारी पूर्ण होते, अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळेच या वारीला परतवारी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी एकादशीच्या पुर्व संध्येला विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणावरुन भाविक मुक्कामी येतात. परतवारी सोहळ्याची सांगता हभप दादाराव महाराज कऱ्हाळे काल्याच्या कीर्तनाने होते. या ठिकाणी येणाऱ्या भाविक, भक्तांची राहण्याची व फराळाची व्यवस्था परिसरातील मंडळी ग्रामस्थांच्यावतीने व नामदेव संस्थान, दानशूर मंडळीतर्फे करण्यात आली आहे. शिवाय येथे परतवारीनिमित्त काकडा भजन, नामदेव महाराज गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर इ. धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तसेच येथे येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रा. आ. केंद्रात पथक तयार केले आहे. यात डॉ. सोनवणे, डॉ. हरण, रायबोले, गायकवाड, पठाण यांची नियुक्ती केली आहे.