शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.

तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनासह विविध शासकीय यंत्रणांनी भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची जय्यत तयारी केली असून, तुळजापूर वासियांसह प्रशासनही भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.२५ सप्टेंबर रोजी पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, दुपारी १२ वाजता घटस्थापना होऊन ब्रह्मवृंदास अनुष्ठानाची वर्णी देण्यात येणार आहे. रात्री छबीना मिरवणूक होणार आहे. २६ व २७ रोजी नित्योपचार पूजा व रात्री छबीना होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी ललीता पंचमी, नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना. २९ रोजी नित्योपचार पूजा व मुरली अलंकार महापूजा व रात्री छबीना. ३० रोजी नित्योपचार पूजा शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबीना. १ आॅक्टोबर रोजी नित्योपचार पूजा व भवानी तलावार अलंकार महापूजा व रात्री छबीना असे कार्यक्रम होणार आहेत. २ आॅक्टोबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त नित्योपचार महापूजा होऊन महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ७ वाजता वैदिक होमास व हवनास प्रारंभ होऊन दुपारी १२.१० वाजता पूर्णाहुती तर रात्री छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी महानवमीनिमित्त नित्योपचार पूजा झाल्यानंतर दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधी पार पडणार आहे. यानंतर घटोत्थापना होऊन सायंकाळी सार्वत्रिक सिमोल्लंघन, शमीपूजन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ४ आॅक्टोबर विजयादशमी (दसरा) असून, या दिवशी उष:काली श्रीदेवीजींचे शिबिकारोहन, सीमोल्लंघन मंदिराभावेती मिरवणूक झाल्यानंतर देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. यानंतर ७ आॅक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमेदिवशी रात्री भवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, ८ रोजी मंदिर पोर्णिमा नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबीना मिरवणूक तर ९ आॅक्टोबर रोजी नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबीना मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. नारनवरे यांनी कळविले आहे. (वार्ताहर)आई राजा उदोऽ उदोऽऽचा जयघोष करीत हलगी, ताशा, ढोल, लेझीम, झांजपथकांच्या गजरात हजारो भाविक बुधवारी भवानी ज्योत घेऊन तुळजापूर शहरात दाखल झाले. भाविकांनी येथील बसस्थानक परिसर, शिवाजी चौक ते महाद्वार चौक, भवानी रोड भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरात वाहनधारकांना प्रवेशबंदी केली. सर्व प्रमुख रस्त्यांच्या तोंडावर बॅरिगेटींग बसवून नाकाबंदी करण्यात आली. तसेच महत्वाच्या ठिकाणी कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला. बुधवारी घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला राज्याच्या तसेच परराज्यातील हजारो भाविक आपापल्या मंडळासमवेत देवी दर्शनासाठी तसेच भवानी ज्योत प्रज्वलित करण्यासाठीी दाखल झाले. मंडळाच्या नावाचे बॅनर, देवीचा फोटो, टी-शर्ट, कपाळी डोकी पट्टा, सोबत वाद्याचा गजर यासह भाविक तुळजापुरात दाखल होत होते. मंगळवारी रात्रीनंतर बीड, अहमदनगर, जालना, अमरावती, अकोला, जळगाव, औरंगाबाद आदी ठिकाणाहून युवक भाविक भवानी ज्योतीसह तुळजापुरात दाखल झाले. यामुळे बुधवारी पहाटेपासूनच उस्मानाबाद रोडवर दुतर्फा वाहनांच्या रांगा दिसून आल्या. बार्शी, सोलापूर, पुणे, विजापूर या भागातून येणाऱ्या भाविकांमुळे आराधवाडी, घाटशीळ परिसर गर्दीने फुलला होता. दुपारी चार वाजेनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ होत असल्याचे दिसून आले. वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पोलीसांनी प्रमुख रस्त्यावर खाजगी वाहनांना प्रवेशबंदी केली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान-मोठ्या हॉटेलमध्ये गर्दी झाली होती. तसेच प्रासादिक दुकानेही भाविकांच्या गर्दीमुळे गजबजली होती. रस्त्याच्या कडेला बांगड्या विकणाऱ्या महिलांकडेही बांगड्या खरेदीसाठी महिला भाविकांची गर्दी झाली होती.