शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाई गोरखनाथ येथे महापोळ्याची तयारी

By admin | Updated: August 24, 2014 23:53 IST

अंबादास फेदराम, आंबाचोंढी श्रीक्षेत्र वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या करीला महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बैल पोळ्याचे आयोजन करण्यात येते.

अंबादास फेदराम, आंबाचोंढीश्रीक्षेत्र वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या करीला महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बैल पोळ्याचे आयोजन करण्यात येते. परिसरातील सर्वच गावातून ज्येष्ठ ग्रामस्थांनी नेमलेल्या पंचकमेटीमार्फत यंदाच्या संपुर्ण यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे वाई गोरखनाथ येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. यात्रेकरू व बैलांना पाणी पाजण्यासाठी मोठी अडचण होणार आहे. यावर्षी हिंगोली जिल्हा परिषदेने विशेष बाब म्हणून कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे टँकर व चाऱ्याचा पुरवठा करावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली होती. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिलेले दिसत नाही. सदरील तीर्थक्षेत्राला ब गटात समाविष्ट करावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच पशुवैद्यकीय खाते म्हणावे तशी सेवा देत नाही. जिल्ह्याच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने याकडे लक्ष देवून आपली एक दिवशीय विशेष पथक तयार करून येणाऱ्या साठ ते सत्तर हजार बैलजोड्यांची सेवा होईल, अशी उत्कष्ट पशुवैद्यकीय डॉक्टरांची फळीच येथे तयार ठेवावी. येथे पौष पौर्णिमेला यात्रा महोत्सव, तसेच रामभाऊ महाराज पुण्यतिथी, श्रावण प्रतिपदेला नवनाथ ग्रंथवाचन, भाद्रपद प्रतिपदेला बैलांची भव्य यात्रा कार्तिकी त्रयदशीला गोरखनाथ महाराज प्रगटदीन साजरा होतो. संपुर्ण मराठवाड्यातून यात्रेनिमित्त तमाशामंडळे, झुलेवाले, मिठाई, कटलरी, भांड्याचे व्यापारी मोठ्या प्रमाणात येवून यात्रेची शोभा वाढवतात. यंदाही पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच नागेशवाडीवरून हट्ट्यामार्गे व वसमतहून ते झिरोफाटामार्गे वाहतुक वळवून वसमत टी पाँईट ते नागेशवाडी वाहनमुक्त परिसर ठेवून बैलांना येण्या-जाण्यासाठी राज्यरस्ता मोकळा ठेवण्यात आला आहे.