शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रीपेड मीटरच्या निर्णयाला बे्रक

By admin | Updated: November 2, 2016 00:50 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने शहरातील वीजचोरी रोखण्यासाठी प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचा निर्णय घेतला होता;

औरंगाबाद : महावितरण कंपनीने शहरातील वीजचोरी रोखण्यासाठी प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु मीटरची किंमत आणि त्यामध्येही वीजचोरी वाढण्याची शक्यता लक्षात येताच महावितरणने प्रीपेड मीटर बसविण्याचा निर्णय गुंडाळला आहे. अनेकदा जुने विद्युत मीटर बदलण्याची व नवीन विद्युत मीटर बसविण्याची मोहीम कंपनीने राबविली; परंतु वीज ग्राहकांनी वीजचोरीसाठी वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवून महावितरणच्या संशोधन आणि विकास विभागाला आव्हान दिले. प्रीपेड विद्युत मीटरची किंमत ४ हजार ५०० रुपयांच्या आसपास होती. ते मीटर बदलणे आणि ग्राहकांकडून ती रक्कम वसूल करण्याबाबत अनेक अडचणी होत्या. तसेच वीजचोरी थांबेल, असा कुठलाही आशावाद कंपनीला नव्हता. त्यामुळे प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याच्या मोहिमेला ब्रेक लागला. कंपनीने सुरुवातीला आयआर या प्रकारातील विद्युत मीटर बसविले. हे मीटर रिमोटने हँग होत असे. त्यानंतर टँपर प्रूफ मीटर मागविले; परंतु त्या मीटरचे सील तोडण्याचे प्रकार वाढीस लागले. ग्राहकांच्या विरोधात अनेक दंडात्मक कारवाया केल्या; परंतु त्यातूनही कंपनीच्या हाती काहीही लागले नाही. सद्य:स्थितीत नवीन विद्युत मीटर बसविण्याची मोहीम वैजापूर पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे. महावितरण कंपनीने जुने चकतीचे मीटर बदलले, त्यानंतर जीटीएलने महावितरण कंपनीने बसविलेले मीटर बदलले. आता पुन्हा महावितरण कंपनी जीटीएलने बदललेले परंतु फॉल्टी असलेले मीटर बदलत आहे. चकतीचे व षटकोनी आकाराचे जुने मीटर अनेक ठिकाणी असून त्याकडे कंपनीचे स्थानिक अभियंते व कर्मचारी क्षुल्लक लोभापायी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.