औरंगाबाद : गुरूगौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघ सिडकोच्या वतीने आयोजित चातुर्मासानिमित्त सिद्धांत शास्त्री मधुर व्याख्यानी प्रशांतकंवरजी म.सा यांचे बुधवारी आगमन झाले. प्रशांतकंवरजी म.सा. सोबत कुशल सहयोगी बालब्रह्मचारी दिव्य प्रभाजी म.सा., सेवाभावी प्रेरणाश्रीजी म.सा. आदिठाणा यांचे सिडको एन-३ येथील अहिंसा भवन येथे आगमन झाले. तत्पूर्वी सकाळी सेव्हन हिलपासून शोभायात्रा काढण्यात आली. विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या हॉलमध्ये प्रवचन झाले. याप्रसंगी राष्ट्रसंत कमलेशमुनीजी म.सा. आदिठाणा ४, उज्ज्वलकंवरजी म.सा.आदिठाणा ३ व पुष्करमुनीजी आदिठाणा २ यांची प्रमुख उपस्थिती होती. चातुर्मासांतर्गत दररोज विविध धार्मिक कार्यक्रम अहिंसा भवन येथे होणार आहेत. सूत्रसंचालन सीमा झांबड व मधु जैन यांनी केले. यावेळी गुरूगौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाचे अध्यक्ष आ.सुभाष झांबड, उपाध्यक्ष प्रकाश बाफना, श्रावक संघाचे सुरेश चंडालिया, रतिलाल मुगदिया, नवीनचंद चंडालिया, डॉ. प्रकाश झांबड, जी.एम.बोथरा, अरुण मुनोत यांच्यासह उपासिका बहु ग्रुप व युवा मंचचे सदस्य हजर होते.
प्रशांतकंवरजी म.सा. यांचे सिडकोत आगमन
By admin | Updated: July 7, 2016 23:55 IST