शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

आलिया भटचा दमदार अवतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:02 IST

संजय लीला भन्साळी यांचा मच अवेटेड ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. भन्साळींच्या वाढदिवशी टीझर रिलीज करण्यात आला ...

संजय लीला भन्साळी यांचा मच अवेटेड ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. भन्साळींच्या वाढदिवशी टीझर रिलीज करण्यात आला असून, आलिया एका वेगळ्या स्टाइलमध्ये दिसत आहे. हा चित्रपट किती दमदार असेल याची झलक टीझरमधून दिसतेय. ‘कहते हैं कि कमाठीपुरा में कभी अमावस्या की रात नहीं होती, क्योंकि वहां गंगू रहती है...’ टीझरच्या सुरुवातीलाच हा डायलॉग ऐकून अंगावर काटे उभे राहतात. आलिया भटने गंगूबाई काठियावाडीच्या भूमिकेत जीव ओतला आहे. तिचे डायलॉगही कमाल आहेत. आलिया पहिल्यांदाच या चित्रपटातून एका महिला गँगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आलियाचा हा चित्रपट तिच्या पुढील करियरसाठी कलाटणी देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दो दिल मिल रहे है चुपके-चुपके

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या सिनेमांपेक्षा कमी; पण खाजगी गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील असाच आणखी एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये सारा दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता विजय देवरकोंडासोबत एकत्र पाहायला मिळत आहेत. नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने पार्टीचे आयोजन केले होते. तेव्हाही सारा विजय देवरकोंडासोबतच जास्त वेळ घालवताना दिसली. फोटोमध्ये पोज देतानाही ती विजय देवरकोंडासोबतच दिसली आहे. चाहत्यांनाही या दोघांची जोडी परफेक्ट वाटत असून, भरभरून लाइक्स आणि कमेंटसचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

शिल्पाच्या बिकिनी लूकचा धुमाकूळ

शिल्पा शेट्टीने बीचवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, यात तिने बिकिनी घातल्याचे पाहायला मिळत आहे. बिकिनी फोटोमुळे शिल्पा शेट्टी नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. तसेच या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. बिकिनीत बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकाच मादक आहे. अनेकांनी तिच्या या हॉट लूकचे कौतुक केले आहे. तिच्या फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसेच खूप सारे लाइक्स आले आहेत. तिची ही पहिलीच वेळ नसून याआधी देखील तिने अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

कंगना रनौत करणार राजनीती

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिचा बहुप्रतिक्षित राजकीय चित्रपट ‘थलाइवी’ हा २३ एप्रिलला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. जयललिला यांच्या ७३ व्या जयंतीच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांचा जीवन प्रवास उलगडणार असून, कंगना जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. एल. विजयने केले आहे आणि यात अरविंद स्वामी, प्रकाश राज, मधू आणि भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात जयललिता यांचा अभिनयाच्या कारकीर्दीपासून राजकीय प्रवास रेखाटण्यात आला आहे.