शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणी योजनांची वीज ‘गूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:26 IST

सहा कोटींचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

श्यामकुमार पुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सहा कोटींचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.१६५ पाणीपुरवठा योजनांकडे महावितरण कंपनीचे तब्बल ५ कोटी ८३ लाख रुपये वीजबिल थकले आहे. त्यामुळे या वसुलीसाठी गेल्या आठ दिवसांत १४० पाणीपुरवठा योजनांची वीज महावितरणने ‘गूल’ केली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.तालुक्यातील ११ गावात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ११ गावांत आणखी टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे. अजून ९ गावांत टँकर सुरू करण्याची मागणी आली आहे. नाटवी, आमसरी, मादनी, उंडणगाव, भराडी,पालोद, वांगी, मोढा, रहिमाबाद, दहीगाव, अंभई, कोटनांद्रा, धानोरा, केळगाव, सावखेडा, आधारवाडी, शिवना, खुपटा, जळकी बाजार, वडाळी, चांदापूर, मंगरूळ, आसडी, सराटी, हळदा, बोदवड, मुखपाठ या पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावात प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न करीत असताना महावितरण कंपनीने गावकºयांना ‘शॉक’ दिल्याने नाराजी वाढली आहे.महावितरणच्या एकूण थकीत १० कोटी ८३ लाख रुपयांपैकी १ कोटी ५० लाख रुपये आठ दिवसांत वसूल झाले आहे. त्यात पाणीपुरवठा योजनेकडून ११ लाख तर इतर ग्राहकांकडून मिळून एकूण १ कोटी ५० लाख रुपये वसूल झाले असल्याचे अधिकार यांनी सांगितले.तालुक्यातील १४० पैकी ४० पाणीपुरवठा योजनांचे बिल भरले आहे. त्यामुळे तासगाव, अजिंठा, वसई, मंगरूळ, गव्हाली, भवन, मोढा, पिरोला, लोणवाडी, कासोद म्हसला खुर्द, बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी, उपळी, घाटनांद्रा, चारनेर, पेंढगाव,खुपटा, गोळेगाव, लिहाखेडी, मांडणा आदी ४० पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू करण्यात आले. अजूनही तालुक्यातील १०० पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट आहे. लवकर थकबाकी भरून सहकार्य करावे.-एस. बी. अधिकार, उपविभागीय अभियंता, महावितरण४सिल्लोड तालुक्यात २६ हजार २०० शेतकरी वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून मागील तीन महिन्यात ३ कोटी ५० लाख रुपये वसूल करण्यात आले असले तरी अजून ५३ कोटी ५० लाख रुपये बाकी आहे.-एस. बी. अधिकार,उपविभागीय अभियंता महावितरण सिल्लोड