शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘द फॅमिली मॅन- २’चे प्रदर्शन लांबणीवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:02 IST

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याची मुख्य भूमिका असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांची मने जिंकली ...

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याची मुख्य भूमिका असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी या वेब सिरीज दुसर्‍या सीझनच्या प्रदर्शनाची घोषणा करून रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. पण याचे रिलीज काहीशे पुढे जाऊ शकते. कारण सध्या ‘तांडव’ आणि ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजमुळे वाद सुरू झाला आहे. या दोन्ही वेब सिरीजच्या विरोधात देशातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे अ‍ॅमेझॉन प्राइम ‘द फॅमिली मॅन- २’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

निया शर्माचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ

टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. निया शर्माने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या हॉट आणि बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते. आता पुन्हा तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्याला मोठी पसंतीही मिळते आहे. निया शर्माने पोस्ट केलेल्या ब्लॅक साडीमधील बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर तिची जबरदस्त चर्चा आहे. निळसर हिरेजडीत ऑफ शोल्डर लेहंगा घातलेल्या नियाच्या फोटोला, या लूकला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात ब्लॅक कलरचा स्कर्ट-ब्लाउजमध्ये काढलेल्या या फोटोत नियाचा सुपर हॉट अंदाज पाहायला मिळतो आहे.

बिग बजेट चित्रपटात झळकणार बॉबी देओल

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आश्रम या वेब सिरीजमुळे पुन्हा प्रसिद्धी झोतात आला आहे. ‘काशीपूरवाले बाबा’या त्याच्या भूमिकेचे मोठं कौतुक करण्यात आलं होतं. या भूमिकेमुळे अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांचे त्याने लक्ष वेधून घेतले आहे. विविध बॅनर्सच्या ऑफर्सदेखील त्याला मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता त्याला मोठी लॉटरी लागली असून, दाक्षिणात्य चित्रपटामध्ये लवकरच बॉबी दिसणार आहे. हा चित्रपट खूप भव्यदिव्य असणार असून, बाहुबलीच्या समान हा नवीन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. यामध्ये बॉबी व्हिलनची भूमिका साकारणार आहे. आश्रममधील त्याच्या भूमिकेनंतर आता या दाक्षिणात्य चित्रपटामधील भूमिकेमुळे त्याची अभिनयाची गाडी रुळावर येऊन करिअर वेग पकडू शकते.