शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी थांबले पोस्टमार्टेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:37 IST

घाटी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मंगळवारी (दि. १७) पाण्याअभावी शवविच्छेदन प्रक्रिया थांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मंगळवारी (दि. १७) पाण्याअभावी शवविच्छेदन प्रक्रिया थांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सकाळपासून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्याचा प्रश्न न सुटल्याने संयम सुटल्याने नातेवाईकांनीच टँकर मागविला.घाटीत सकाळी ६ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ दोन मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. शवविच्छेदनगृहातील पाणी संपल्याने दुपारपर्यंत तीन मृतदेहांचे शवविच्छेदन थांबले. सिडको बसस्थानक चौकात झालेल्या अपघातातील मयत बालाजी ढंगारे यांच्या नातेवाईकांनाही मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत वाट बघावी लागली. पाण्यामुळे शवविच्छेदन होत नसल्याची कल्पना येताच नातेवाईकांनीच टँकर मागवून घेतले. केवळ टँकर मागवून नातेवाईक थांबले नाही तर त्यांनी स्वत: टाक्यांमध्ये पाणी चढविण्यासाठी मदत केली. मयतांचे नातेवाईक आणि मित्रांनी संताप व्यक्त करताच घाटी प्रशासनानेही टँकर मागविला. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरळीत झाली.घाटीत दररोज २ ते १४ मृतदेहांचे शवविच्छेदन होते. यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने येथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. सोमवारी दिवसभरात १४ मृतदेहांचे शवविच्छेदन झाले; परंतु दुस-या दिवशी पुरेसे पाणी आहे की नाही, याची खबरदारी घेण्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे मंगळवारच्या घटनेने समोर आले.