शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अधिकाऱ्यांना पदस्थापना

By admin | Updated: July 8, 2017 00:28 IST

नांदेड : महापालिकेतील अधिकाऱ्यांना नव्याने पदस्थापना दिल्या असून उपायुक्तांना खातेवाटप करण्यात आले आहेत़ सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्याकडे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेतील अधिकाऱ्यांना नव्याने पदस्थापना दिल्या असून उपायुक्तांना खातेवाटप करण्यात आले आहेत़ सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्याकडे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली असून वादग्रस्त ठरलेल्या सहायक आयुक्त संजय जाधव यांना तरोडा क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे़ शहरातील अस्वच्छतेला कारणीभूत ठरलेल्या सहायक आयुक्त संजय जाधव यांना स्थायी समितीने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव मंजूर केला होता़ शहर स्वच्छतेच्या बाबतील अपयश आल्याने व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने सर्व सदस्यांच्या संतापाला संजय जाधव कारणीभूत ठरले होते़ सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्याकडे तरोडा क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी होती़ गुलाम सादेक यांनी तरोडा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक कर वसुली व स्वच्छतेची कामे केली़ त्यामुळे आता त्यांच्यावर शहराच्या स्वच्छता विभागाची जबाबदारी सोपविली आहे़ तसेच उपायुक्त संतोष कंदेवार यांच्याकडे निवडणूक विभाग, उद्यान, स्टेडियम, आपत्ती व्यवस्थापन, विधि, शिक्षण, क्रीडा पशुसंवर्धन तर उपायुक्त संभाजी वाघमारे यांच्या सामान्य प्रशासन, आस्थापना, कर, स्थानिक संस्था कर, नगररचना, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याकडे अमृत योजना, बीएसयुपी, पीएमएवाय, पाणीपुरवठा, बांधकाम, भूसंपादन, जनगणना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे विषय सोपविले आहेत़