शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पर्धेच्या जगात’ पोस्टरचे विमोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:35 IST

‘लोकमत’ने ‘घडवा तुमचे युनिक भविष्य’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत ‘स्पर्धेच्या जगात’ ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखमालिका सुरू केली आहे. मंगळवारी (दि.१) शिवछत्रपती महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते उपक्रमाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉक्टर व इंजिनिअर होण्याची मनीषा बाळगण्याच्या काळात तरुणाईचा स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला कल आनंदाची गोष्ट आहे. प्रशासकीय अधिकारी होऊन देशसेवा आणि समाजसेवा करण्यासाठी प्रेरित या तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने ‘लोकमत’ने ‘घडवा तुमचे युनिक भविष्य’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत ‘स्पर्धेच्या जगात’ ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखमालिका सुरू केली आहे. मंगळवारी (दि.१) शिवछत्रपती महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते उपक्रमाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. पी. व्ही. अष्टेकर, अभिजित देशमुख, ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन, ब्यूरो चीफ नजीर शेख आणि वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे उपस्थित होते.स्पर्धा परीक्षांबाबत जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांना मार्गदर्शन करताना नागनाथ कोडे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ज्ञान व माहिती वर्तमानपत्रातून मिळते. विविध विषयांची अद्ययावत माहिती बातम्यांद्वारे कळत असते. आता ‘लोकमत’ने खास स्पर्धा परीक्षांची माहिती देण्याचा उपक्रम हाती घेतल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.विद्यार्थ्यांनी आवर्जून याचा लाभ घेतला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, मेहनत, जिद्द, चिकाटी या जोरावर यश मिळवले जाऊ शकते ही पक्की खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. ध्येय ठरवून सकारात्मक विचारांनी मेहनत करा, असा सल्ला त्यांनीदिला.प्राचार्य अष्टेकर म्हणाले, स्वत:वर विश्वास ठेवून मोठे स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र एक करा. स्पर्धा परीक्षांमध्ये भविष्य घडवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना ‘लोकमत’च्या लेखमालेतून मार्गदर्शक धागा मिळेल.सुधीर महाजन यांनी स्पर्धा परीक्षांचे वाढते लोण अधोरेखित करून सांगितले की, या लेखमालेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तांत्रिक माहिती, तयारी कशी करावी, परीक्षेचे स्वरूप आदी गोष्टींची इत्थंभूत माहिती मिळेल. सर्व क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातही मुलींनी बाजी मारावी, असे तेम्हणाले.