शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲपवर मांडुळचे छायाचित्र पाठविले अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:02 IST

मनोहर नारायण भवरे (४७, रा. शास्त्रीनगर, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत ...

मनोहर नारायण भवरे (४७, रा. शास्त्रीनगर, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शास्त्रीनगरात वॉचमन म्हणून काम करणारा मनोहर भवरे याने साथीदाराच्या मदतीने बिडकीन येथे मांडूळ पकडले. सुमारे दोन वर्षे वयाचे हे मांडूळ आहे. या मांडुळाला मोठी किंमत मिळते असे त्याला समजले होते. यामुळे भवरे आणि त्याचा साथीदार मांडूळ विक्रीसाठी ग्राहक शोधत होता. त्याने मांडुळाची छायाचित्रे काही लोकांना पाठविले होते. याविषयीची माहिती खबऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी एका पोलिसाला ग्राहक म्हणून भवरेशी संपर्क साधायला लावला. भवरेने त्यांच्याही व्हॉट्सॲपवर मांडुळाचे छायाचित्र पाठविले आणि सौदा करण्यास सांगितले. भवरेने ४ लाखांत मांडूळ विक्री करण्याची तयारी दर्शविली. त्याला मांडूळ घेऊन विशालनगर येथे बोलावून घेतले. तो मांडूळ घेऊन येताच पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेले मांडूळ वनविभागाच्या ताब्यात दिल्याचे स.पो.नि. सोनवणे यांनी सांगितले.

======

चौकट

गुप्तधन काढण्यासाठी मांत्रिकाकडून मांडुळाला मागणी

गुप्तधन काढण्यासाठी आणि जादूटोणा करणारे लोक मांडुळाचा वापर करतात. मांडूळ गुप्तधन शोधण्यासाठी महत्त्वाचे काम करते असा मांत्रिकांचा समज असतो. यामुळे मांत्रिक मांडूळ खरेदी करतात, असे म्हटले जाते.