अमरावती : जिल्हा परिषदेतील समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि आरोग्य, अर्थ, बांधकाम, शिक्षण या चार विषय समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवार १ आॅक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोळाबेरजेच्या राजकीय समिकरणात जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीवर सत्ताधारी काँॅग्रेस की विरोधी शिवसेना, भाजप बाजी मारणार याची चर्चा रंगू लागली आहे.जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस व वऱ्हाड विचार मंचचे वर्चस्व आहे. मागील वेळी जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या निवडणुकीत सर्वाधिक २५ सदस्य असलेल्या कॉग्रेसला बाजुला सारत विरोधी पक्षांनी विषय समितीवर वर्चस्व मिळवले होते.
जिल्हा परिषदेत सभापती पदासाठी रस्सीखेच
By admin | Updated: September 30, 2014 23:29 IST