शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

झालर क्षेत्र आराखड्यावर लवकरच निर्णयाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:42 IST

सिडकोने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शहरालगतच्या २८ गावांसाठी तयार केलेला विकास आराखडा मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडकोने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शहरालगतच्या २८ गावांसाठी तयार केलेला विकास आराखडा मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २९ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये याबाबत निर्णय होणार आहे. आराखड्याबाबतीतील असलेल्या याचिकांवर निर्णय झाल्याची चर्चा असून, त्या अनुषंगाने मंजुरीबाबत शासन २९ रोजी काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.सिडकोने झालर क्षेत्रात काम करण्यास स्पष्टपणे शासनाला नकार दिला आहे. त्यामुळे शासनाने आराखड्याला मंजुरी दिली तरी ‘नियोजन प्राधिकरण’ म्हणून कोणाकडे जबाबदारी द्यावी, यावर शासनाची भूमिका काय असेल याबाबत अजून काहीही निश्चित धोरण ठरलेले नाही. २००८ ते २०१७ पर्यंत या ९ वर्षांत झालरमधील शेतकरी, नागरिकांची कुचंबणा झाली आहे. शासनाकडे मंजुरी, प्राधिकरण नेमण्यासाठी झालरचा आराखडा प्रलंबित आहे. त्याबाबत अपेक्षित निर्णयासाठी शेतकरी लोकप्रतिनिधींना साकडे घालीत आहेत. सिडकोचा सर्क्युलर ऐवजी लिनियर पद्धतीने भूसंपादन करण्याचा हेतू आहे. भूसंपादन प्रक्रिया आणि आर्थिक तडजोडीमुळे सिडको व्यवस्थापन झालर क्षेत्रामध्ये काम करणार नाही.१५ हजार ७८४ हेक्टर जागासातारा, देवळाई, बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्चीघाटी, मल्हारपूर, मांडकी, गोपाळपूर, पिसादेवी, कृष्णापूर, तुळजापूर, सावंगी, अश्रफपूर, इस्लामपूर, ओहर, जटवाडा, दौलतपूर, बागतलाव, सैजतपूर, गेवराई, गेवराई तांडा, अंतापूर या गावांतील १५ हजार ७८४ हेक्टर जमिनीवर नगररचनेचे विशेष प्राधिकरण म्हणून सिडकोने आरक्षण टाकले आहे. यातील सातारा-देवळाई ही गावे मनपात गेली आहेत. त्यामुळे २६ गावांसाठी नियोजन करण्याची जबाबदारी कुणाकडे जाते, याकडे लक्ष आहे.शेतकºयाचे मत असेझालर क्षेत्रातील शेतकरी नंदकिशोर काळे यांनी सांगितले, ९ वर्षांपासून शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरीही आराखड्याला मंजुरी मिळत नाही. आराखडा मंजुरीसाठी विधानसभा अध्यक्ष बागडे यांना निवेदन दिले असून, लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.