शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लिश स्कूलची जागा ताब्यात

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

विठ्ठल भिसे, पाथरी शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या जागेचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जागेची मोजणी होऊन नकाशा तयार करण्यात आला

विठ्ठल भिसे, पाथरीशहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या जागेचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जागेची मोजणी होऊन नकाशा तयार करण्यात आला आणि त्यानंतर ही जागा शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे शाळेची इमारत आणि १०० मुलींचे वसतिगृह येत्या वर्षभरात उभे केले जाणार आहे. केंद्र शासनाने ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाची विद्यार्थ्यांना गोडी लागावी यासाठी नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर राज्यामध्ये मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दोन वर्षांपूर्वी घेतला. सहावीच्या वर्गापासून या शाळा प्रत्येक तालुकास्तरावर सुरू झाल्या. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळांमधून देण्यात येणार असल्याने पालकांचा लोंढाही या शाळेकडे होता. शाळा सुरू करतानाच मॉडेल इंग्लिश स्कूलसाठी स्वतंत्र इमारत, १०० मुलींचे वसतिगृह यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आली. इमारत उभी करण्यापूर्वी या शाळा तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुरू करण्यात आल्या. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत या शाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे येथे उपकार्यालय सुरू करण्यात आले. तर तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली या शाळेवर देखरेख करण्यासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. पाथरी येथे ही शाळा दोन वर्षांपूर्वी सुरू झाल्यानंतर शाळेच्या बांधकामासाठी जागेचा शोधही सुरू झाला. शहरातील सर्वे नं. ६७, बोरगव्हाण शिवारातील जायकवाडीची जागा या शाळेच्या इमारतीसाठी घेण्याचे प्रयत्न झाले. परंतु यामध्ये अडचणी निर्माण झाल्याने शाळेच्या जागेचा प्रश्न रखडून पडला होता. मागील सहा महिन्यांपूर्वी पोहेटाकळी शिवारात जायकवाडीची जागा महसूल विभागाने शासनाच्या नावे करून घेतली. त्यानंतर याच जागेतील पाच एकर जागेमध्ये मॉडेल इंग्लिश स्कूलची इमारत बांधण्याचा प्रस्ताव तहसीलदारांंनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. या प्रस्तावानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूमिअभिलेख कार्यालयाला जमीन मोजून नकाशा तयार करण्याबाबतचे आदेशही काढले होते. त्यानुसार भूमीअभिलेख कार्यालयाने सर्वे नं. ८३ मधील ५ एकर जमीन मोजून तिचा नकाशा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव सादर केला होता. या आलेल्या प्रस्तावानंतर जागेचा नकाशा आणि जमीन ताब्यात घेण्याबाबतची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. यामुळे दोन वर्षांपासून रखडलेला मॉडेल इंग्लिश स्कूलच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नवीन जागेमध्ये शाळेचे स्थलांतर येथील मॉडेल इंग्लिश स्कूल गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये भरविण्यात येत होती. या ठिकाणी सोयी-सुविधा नसल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शाळा नवीन शाळेमध्ये स्थलांतरित करण्याबाबतचा ठराव घेतला होता.माध्यमिक शिक्षण विभागाच्या परवानगीने अखेर मॉडेल इंग्लिश स्कूल नवीन शाळेमध्ये स्थलांतरित करून वर्ग सुरू करण्यात आले आहेत. वसतिगृहही उभारणारमॉडेल इंग्लिश स्कूलसाठी सर्व सोयीयुक्त इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर या शाळेच्या परिसरात १०० मुलींचे वसतिगृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, पुणे यांच्याकडे सादर केला जाणार आहे.