शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

‘लॉन’च्या कामात पोरखेळ

By admin | Updated: February 10, 2015 00:31 IST

सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या सुशोभिकरणासाठी सुमारे ६० लाखांचा निधी आला. यातील निम्मा निधी हा केवळ ‘लॉन’च्या कामासाठी आहे,

सोमनाथ खताळ , बीडयेथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या सुशोभिकरणासाठी सुमारे ६० लाखांचा निधी आला. यातील निम्मा निधी हा केवळ ‘लॉन’च्या कामासाठी आहे, मात्र हे काम संथगतीने तर सुरूच आहे, शिवाय कामांचे योग्य नियोजनही नसल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.जिल्हा क्रीडा संकूल असूनही याठिकाणी खेळाडंूना अपेक्षेप्रमाणे सोयी-सूविधा मिळत नाहीत. त्यांच्या राहण्यापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत कसलीच सुविधा खेळाडूंना नव्हती. मात्र काही संघटनांनी हे क्रीडा संकूल सुसज्ज व्हावे, अशी मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीने या संकुलाचा प्रस्ताव दाखल केला. याला मंजुरीही मिळाली. त्याप्रमाणे या कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी क्रीडा कार्यालयाला मिळाला. यामध्ये ३० लाखांचे काम हे केवळ लॉनचे असून स्प्रींकलरद्वारे पाणी देण्यासाठी १४ लाखांचा निधी आहे. मात्र सध्या हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप खेळाडूंमधून होत आहे. लॉनसाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत दगड आणि बारीक मुरूम असल्याचे दिसून आले. ‘पोयटा’ ही माती ‘लॉन’साठी उपयुक्त असताना दुसरीच माती वापरली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.मागील काही दिवसांपासून जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ कार्यालयात थांबण्याऐवजी इतर कामातच जास्त व्यस्त असल्याने या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार आहे.गुत्तेदारांकडूनही या कामाचे योग्य नियोजन न करता काम केले जात आहे. त्यामुळे यामध्ये निकृष्टता येत असल्याचा आरोप केला जात आहे. हे काम चांगल्या दर्जाचे करून खेळाडूंसाठी दर्जेदार मैदान तयार करावे, अशी मागणी क्रीडाप्रेमी व खेळाडूंमधून केली जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी आडसूळ यांच्याशी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)लॉनच्या कामासाठी चांगल्या दर्जाची माती असावी. मैदानाच्या मध्यभागी सहा इंच उंची असावी, व त्यांनतर कमी कमी करावी. लॉनच्या बाजूने ट्रॅक असावा. लॉनवरील पाणी जाण्यासाठी चिटकूनच एक छोटी नाली असावी. त्यांनतर ट्रॅक व पुन्हा एक मोठी नाली, असे याचे नियोजन असते. मात्र यापैकी कुठलेच नियोजन येथे केलेले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे लाखो रूपयाच्या कामावर केवळ पाणी फेरण्याचे काम होत आहे. याकडे मात्र संबंधित गुत्तेदार व जिल्हा क्रीडा अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.