पावसाळ्यात अनेकवेळा नदीला मोठे पूर आले होते. पुलाची उंची कमी असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहिले. यामुळे पुलावरील स्लॅब अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. तसेच पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूने रोडवरील डांबरही जागोजागी उखडले असून खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. अंभई व भराडी ही तालुक्यातील दोन मोठी गावे असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र रस्ता खराब असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो
अंभई - भराडी रस्त्यावरील वडोद (चाथा) गावाजवळ नदीवरील पुलावर जागोजागी पडलेले खड्डे.
290421\img_20210423_074222_1.jpg
भराडी रस्त्यावरील वडोद(चाथा) गावाजवळ नदीवरील पुलावर जागोजागी पडलेले खड्डे.