शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:43 IST

बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दहा दिवसांत हे काम आटोपणे शक्य नाही, म्हणून अधिका-यांनी घोड्याचा आधार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दहा दिवसांत हे काम आटोपणे शक्य नाही, म्हणून अधिका-यांनी घोड्याचा आधार घेतला आहे.बोंडअळीमुळे तालुक्यातील ७६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशीचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करुन दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. हे पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, सरपंच, पोलिस पाटील यांची पथके संपूर्ण तालुक्यात तैनात करण्यात आली आहेत.पण पायी फिरून दहा दिवसात हे काम पूर्ण करणे अशक्य वाटत असल्याने अधिकाºयांनी चक्क घोड्यावर बसून हे पंचनामे पूर्ण करण्याची शक्कल लढवली आहे.तालुक्यातील अंचलगाव येथे मंगळवारी तलाठी पैठणपगारे व इतर कर्मचारी चक्क घोड्यावर फिरून हे पंचनामे पूर्ण करत असल्याचे दिसले.अधिकारी शेताच्या बांधावर घोड्यावर बसलेले पाहून ग्रामस्थ चांगलेच अचंबित झाले.तालुक्यात नुकसानीचे क्षेत्र जास्त असल्याने या कर्मचाºयांना एका दिवसात केवळ ३० ते ४० शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहचणे शक्य होत आहे.५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्णतालुक्यात कपाशीचे ७६ हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झालेले असून आतापर्यंत ५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, दोन दिवसांत संपूर्ण पंचनामे पूर्ण केले जाणार असल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.तालुक्यात एकूणच संपूर्ण कपाशीचे पीक बोंडअळी व किडीने पोखरले असून पंचनामे करणारी यंत्रणासुद्धा ही वास्तवता पाहून हादरली आहे. त्यामुळेच अधिकारी दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या युक्तीचा वापर करीत आहेत.