शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत कृउबासाठी शांततेत मतदान

By admin | Updated: February 27, 2017 00:41 IST

गेवराई : येथील प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी १८ जागेकरता १४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

गेवराई : येथील प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी १८ जागेकरता १४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मंगळवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. कृउबावर सध्या आ. अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही संस्था खेचण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, भाजपचे आ. लक्ष्मण पवार यांनी संयुक्तरित्या शेतकरी बचाव पॅनल उभा केला आहे. दुसरीकडे आ. पंडित यांनी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीतर्फे कृउबातील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जोर लावला आहे. १८ जागेसाठी दोन पॅनलचे २६ उमेदवार आमने - सामने आहेत. रविवार सकाळी ८ ते दुपारी ४ या दरम्यान मतदान झाले. गेवराईसह तालुक्यातील उमापूर, तलवाडा, मादळमोही, जातेगाव, चकलांबा, धोडंराई येथील १४ मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडली. सेवा सहकारी संस्था मतदार संघातील १४६१ पैकी १४३५ (९४.८४ टक्के), ग्रामपंचायत मतदारसंघात ११९२ पैकी १०८० (९०.६० टक्के), हमाल मापडी मतदारसंघात १२३ पैकी १२१ (९८ टक्के) व व्यापारी मतदारसंघात २५५ पैकी २४४ (९९ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.मंगळवारी शहरातील कापूस तंत्रज्ञान केंद्राच्या इमारतीत मतमोजणी होत आहे. त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. (वार्ताहर)