शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावरून रंगले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद: मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या औरंगाबादच्या जनतेला पाणी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा असताना १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा ...

औरंगाबाद: मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या औरंगाबादच्या जनतेला पाणी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा असताना १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्या दुपारी १ वाजता नव्या जलयोजनेचे उद्‌घाटन होणार आहे. याचवेळी भाजपने ही पाणीयोजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंजूर केल्याचे सांगत याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाणीयोजना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर केली असून शहरासह सातारा- देवळाईच्या नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपकडून पाणीयोजनेला आमचा विरोध नाही, कारण ही योजनाच भाजपाने आणलेली आहे, असे सांगण्यात येत आहे. शहरासाठी २००८ साली मंजूर झालेल्या समांतर जलवाहिनी योजनेची अंमलबजावणी न होताच ती योजना बंद करण्यात आली. आता ही नवी जलयोजना समांतरच्या दिशेने जाईल, असा सूर भाजपने आळवला आहे. शिवसेनेने मात्र या योजनेची अंमलबजावणी धुमधडाक्यात करण्याचे ठरविले आहे. दोन्ही पक्षांकडून शहरात श्रेयवादाची लढाई असून पोस्टरबाजीही रंगली आहे.

हे राजकारण रंगण्यामागे आगामी महापालिका निवडणुकीचे गणित असून आम्हीच जनतेला पाणी दिल्याचे श्रेय घेण्याचा हा वाद दिसून येत आहे.