शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बरखास्तीवरुन राजकारण तापले

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरुन उदगीरात चांगलेच राजकारण तापले आहे़ बाजार समिती ताब्यात ठेवून असणाऱ्या

उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरुन उदगीरात चांगलेच राजकारण तापले आहे़ बाजार समिती ताब्यात ठेवून असणाऱ्या माजी आ़चंद्रशेखर भोसले यांनी ही बरखास्ती म्हणजे राजकीय सूडबुद्धी असून, विद्यमान आमदारांनी आता कोणत्याही कुबड्या न घेता थेट निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले़ तर आमदार सुधाकर भालेराव यांनी ही तर सुरुवात आहे, असा सूचक इशारा दिला़बाजार समितीत एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा भोसले यांनी केला़ बरखास्तीच्या आदेशात कोठेही भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख नाही़ आपण पारदर्शकच कारभार केला़ मात्र, केवळ अनियमतता व योजनांना मंजुरी न घेतल्याच्या मुद्यावरुन बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला आहे़ बालिका बचाव योजना, शेतकरी विमा योजना, आरोग्य योजना या शेतकऱ्यांच्या हिताच्याच होत्या़ परंतु, केवळ राजकीय सूडबुद्धीने नियमावर बोट ठेवत बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे़ याविरोधात आम्ही आधीच न्यायालयात गेलो आहोत़ ३ महिने प्रतिष्ठा पणाला लावून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप करीत एवढाच वेळ आमदारांनी उदगीरच्या पाणीप्रश्नाला देणे गरजेचे होते, असे मतही चंद्रशेखर भोसले यांनी व्यक्त केले़ दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीचे घोडामैदान दूर नाही़ त्यात आमदारांनी स्वबळावर उतरुन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले़ आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले की, बाजार समितीच्या भ्रष्टाचाराबाबत बोलायचे झाल्यास वेडा कधी स्वत:ला वेडा म्हणवून घेत नाही, अशी ‘त्यांची’ अवस्था आहे़ गैरकारभार झाल्याशिवायच का बरखास्ती झाली आहे? लढण्याचे म्हणाल तर शेतकऱ्यांची फसवणूक व भ्रष्टाचार याविरुद्ध आपण कायमच लढत आहोत़ ही लढाई पुढेही लढणार आहोतच़ भ्रष्टाचार मुळासकट उपसून टाकून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे़ शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली सुरु केलेल्या योजनांतून लूट झाल्याचा आरोप करीत तेही लवकरच बाहेर येईल, असे भालेराव म्हणाले़(वार्ताहर)