शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून दुष्काळ जाहीर करा - एच.एम. देसरडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 16:39 IST

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी ओढ दिल्यामुळे झालेल्या खरीप पीकबुडीने शेतकरी हवालदिल झाला आहे. हे अस्मानी संकट आता सुल्तानी बनत असून, सरकारने शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रा. एच.एम. देसरडा यांनी रविवारी (दि.१३) पत्रकार परिषदेमध्ये केली.

ऑनलाईन लोकमत  

औरंगाबाद, दि. १४  : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी ओढ दिल्यामुळे झालेल्या खरीप पीकबुडीने शेतकरी हवालदिल झाला आहे. हे अस्मानी संकट आता सुल्तानी बनत असून, सरकारने शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रा. एच.एम. देसरडा यांनी रविवारी (दि.१३) पत्रकार परिषदेमध्ये केली. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळातर्फे आयोजित या पत्रपरिषदेमध्ये कृष्णा हरिदास व डॉ. कृष्णा हातोटे उपस्थित होते.चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत ५३१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्यावर्षी जरी भरघोस पीक आले असले तरी त्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जफेड करू शकले नाहीत. ‘तत्त्वत:’ कर्जमाफी दिली खरी; परंतु तीदेखील व्यवस्थित अमलात आणली गेली नाही. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर फडणवीस सरकारने विश्वासघात केला असून, पीकविम्यामध्ये त्यांनी अत्यंत चलाखीने केवळ कंपन्यांचा फायदा केला.

या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे तेथे लवकरात लवकर दुष्काळ किंवा सरकारी शब्दावलीप्रमाणे ‘टंचाईसदृश स्थिती’ घोषित करण्याची मागणी केली आहे. यासह रोजगार हमी योजनेची कामे पुन्हा सुरू करणे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार गावागावांत अन्नपुरवठा करणे, हप्ते भरलेले असोत वा नसोत सरसकट सर्व शेतकºयांना पीकविम्याचे संरक्षण द्यावे, शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफी, राहणे व जेवणाची सोय करणे, दुष्काळी भागात कर्जवसुली थांबवणे, वीज बिल माफी, चारा व वैरणपुरवठा करणे, अशा मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत.‘मंडळातर्फे मराठवाड्यातील सर्व तालुक्यांमध्ये ‘दुष्काळ साहाय्यता समित्या’ स्थापन करण्यात येणार असून, पाहणी दौरे केले जाणार, अशी माहिती देसरडा यांनी दिली.

उंटावरून शेळ्या हाकणे नकोराज्याची भीषण परिस्थिती विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केवळ मंत्रालयात बसून नाही, तर प्रत्यक्ष गावांत जाऊन पाहावी. जमिनी वास्तव काय हे जाणून घेण्यासाठी या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांनी त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यांतील नागरिकांशी चर्चा करून दुष्काळ निवारण व निर्मूलन योजना जाहीर करावी. १९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा आदर्श घेऊन देखरेख समित्या स्थापन करण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंडळातर्फे पत्राद्वारे करण्यात आली.