शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय सुडापोटी आमच्यावर गुन्हे नोंदविले

By admin | Updated: January 28, 2017 23:37 IST

उस्मानाबाद : समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या, सत्य मांडणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत़

उस्मानाबाद : समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या, सत्य मांडणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत़ बहुजन समाजाच्या वाट्याला येणाऱ्या दु:खाची कारणे शोधण्यासाठी व्यवस्थेला प्रश्न विचारणारे तरूण इथल्या व्यवस्थेला नको आहेत. परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होऊ इच्छिणारे तरूण खचून जावेत म्हणूनच राजकीय सुडापोटी आमच्या सारख्या अनेक तरुणांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे प्रतिपादन क्रांतीशाहीर सचिन माळी यांनी व्यक्त केले़ भारता युवा मंचच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते़उस्मानाबाद येथील भारत युवा मंच वतीने दोन वर्ष भूमिगत आणि चार वर्ष कारावासानंतर जामिनावर सुटका झालेल्या क्रांतीशाहीर सचिन माळी यांचा शहरातील प्रतिष्ठित आणि जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी अंनिसचे एम़डी़ देशमुख, समाजसेवक सदाशिव बनसोडे, नगरसेवक युवराज नळे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती सिद्धार्थ बनसोडे, नगरसेवक माणिक बनसोडे, विद्याताई एडके, समाजकल्याण सभापती हरीश डावरे, संजय वाघमारे, भाऊसाहेब अंदूरकर, हुंकार बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ जातीअंताच्या उंबरठ्यावर सध्या देश उभा आहे. अशा काळात जातीय अस्मिता अधिक टोकदार होवून पुढे येत आहे. त्यामुळे शोषित दु:खी मराठे, ओबीसी बांधव आणि पिचलेला दलित वर्ग यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगून सचिन माळी म्हणाले, विवेकाची चळवळ समाजात रूजविण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले, त्यांना आजवर दडपशाहीचा मुकाबला करावा लागला आहे. दडपशाहीच्या या ऐतिहासिक परंपरेच्या रगड्यातून आमच्यासारखे अनेक सामान्य कुटुंबातील तरूण सध्या चिरडले जात आहेत. जाती व्यवस्थेचे चटके आम्ही सहन केले आहेत. त्यामुळेच आमच्या ओठावर अश्रूंचे गाणे येते. अशा गाण्यांच्या माध्यमातून विवेकवादाचा पुरस्कार करणाऱ्या समाजनायकांवर आम्ही कविता लिहिल्या. मग आम्ही नक्षलवादी कसे, असा सवालही माळी यांनी यावेळी उपस्थित केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत युवा मंचचे भाऊसाहेब अंदूरकर, शीतल वाघमारे, हुंकार बनसोडे, अविनाश ननवरे, सतीश जाधव, अक्षय गायकवाड, रेवण काकडे, सचिन अंदूरकर आदीनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)