शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय ध्रुवीकरण

By admin | Updated: June 24, 2017 23:39 IST

बीड : राजकारणातील भाऊबंदकी म्हणजे काय असते, हे बीड जिल्ह्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता वाटत नाही

सतीश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राजकारणातील भाऊबंदकी म्हणजे काय असते, हे बीड जिल्ह्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जिल्हा उघड्या डोळ्याने बघत आहे. मुंडे, पंडित आणि क्षीरसागर घराण्यातील वाद पुन्हा पुन्हा उगाळण्यापेक्षा या वादाचे दुष्परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर, विकासप्रश्नावर, समाजमनावर कसे होत आहेत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या भाऊबंदकीला सत्तेच्या महत्त्वाकांक्षेची किनार आहे. माझ्यापेक्षा दुसरा कुणी मोठा होऊच नये, अशी वृत्ती आहे. स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या पानात आधी वाढण्याचे संस्कार काळाच्या ओघात विसरत चाललो की काय? असे हे सर्व पाहून वाटू लागले आहे. त्यामुळेच ही भाऊबंदकी, सत्तास्पर्धा इतक्या टोकाला जात आहे की, रक्ताच्या नात्याऐवजी कट्टर विरोधकही जवळचा वाटू लागला आहे. एकमेकावर राजकीय चिखलफेक करणारे आता एकमेकाच्या गळ्यात गळा घालताना दिसत आहेत. बीड पं.स. सभापतीपदासाठी शिवसंग्रामला मदत करून पुतण्या संदीपला सत्तेपासून क्षीरसागर बंधूनी रोखले होते. या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आ. विनायक मेटे हे यापूर्वीचे सर्वकाही विसरून बीड पालिकेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरांच्या मदतीला धावून गेले. तसे बघितले तर पालिकेतील वाद हा पालिकेच्या सभागृहातच मिटावयास पाहिजे. परंतु, विकासाच्या गोंडस नावाखाली नगराध्यक्ष क्षीरसागर आणि आ. मेटे मांडीला मांडी लावून पूर्वीचे मतभेद विसरून बसले. घरातील वाद जेव्हा विकोपाला जातो, तेव्हा बाहेरचे जवळचे वाटायला लागतात. राजकीय हेतू काही का असेना?, परंतु या बैठकीत पालिकेतील वाद मिटले असते तर निश्चितच शहराचे भले झाले असते आणि त्याचे श्रेय आ. मेटे यांनाच मिळाले असते. परंतु, या बैठकीत जुटण्याऐवजी अधिक बिघडले. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागरांचे समर्थक सभापती अमर नाईकवाडे आणि नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्यात स्वच्छतेवरुन तू तू-मै मै पहावयास मिळाली. बैठक सोडून नाईकवाडे निघून गेले.पालिकेतील वाद मिटण्यापेक्षा राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या क्षीरसागर बंधू आणि आ. मेटे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचा उघडउघड संदेश जिल्ह्यास देण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणे होऊ घातली आहेत. त्याची ही सुरूवात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.