शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप

By admin | Updated: May 14, 2014 00:29 IST

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल-२०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार आहे.

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल-२०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार आहे. त्यामुळे मर्जीनुसार प्रभाग रचना व्हावी यासाठी प्रारूप नकाशे तयार करताना पालिकेच्या अधिकार्‍यांना दमदाटी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे नकाशे तयार करणे आणि हद्दी कायम करण्याच्या कामासाठी नेमलेल्या टीमवर दडपण आले आहे. या कामासाठी नेमण्यात आलेले उपायुक्त किशोर बोर्डे आणि मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना यांच्यासह १६ कनिष्ठ अभियंत्यांची टीम दबावाखाली काम करीत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ११ लाख ७५ हजार लोकसंख्येच्या आधारावर कोणतीही हद्द वाढ न करता आताच्या ९९ वॉर्डांचे नकाशे आणि लोकसंख्येचे निकष रद्द करण्यात येणार आहेत. नव्याने प्रभाग रचना करून ११३ ते ११४ वॉर्ड होतील. साधारणत: दोन वॉर्डांतील २० हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. सध्या अस्तित्वात असलेल्या वॉर्डांची लोकसंख्या व नवीन मतदार आणि जनगणनेमुळे वॉर्डांच्या वाढीव लोकसंख्येचा विचार करून वॉर्ड हद्द ठरेल. १ जून २०१४ पर्यंत नकाशा ड्राफ्टिंगची माहिती निवडणूक आयोगाला पाठवावी लागणार आहे. दरम्यान, या मोहिमेचे प्रमुख उपायुक्त किशोर बोर्डे म्हणाले की, हे नकाशा तयार करण्याचे काम आहे. यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप होत नाही. ते काम नि:पक्षपातीपणे होत आहे. या कामासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल. अशी होऊ शकते हेराफेरी जनगणनेसाठी प्रगणकांनी २ हजार लोकसंख्येचा एक ब्लॉक या पद्धतीने सर्वे केला आहे. त्या ब्लॉकआधारेच नकाशे तयार होणार आहेत. ब्लॉकमध्ये हेराफेरी झाल्यास प्रभाग रचनेत पाहिजे त्या मतदारांचा गट समाविष्ट केला जाऊ शकतो. ही बाब २०१५ मध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या पालिकेतील विद्यमान पदाधिकार्‍यांनी हेरली असून, त्यांनी सोयीनुसार वॉर्ड हद्दीचे नकाशे तयार करण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.