शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या टॉपर मुलांना मिळणार एक लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:02 IST

इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजमध्ये टॉपर येणाºया पोलिसांच्या मुलांना एक लाख रुपये शिष्यवृत्ती पोलीस विभागाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी येथे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजमध्ये टॉपर येणाºया पोलिसांच्या मुलांना एक लाख रुपये शिष्यवृत्ती पोलीस विभागाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी येथे केली.एका हॉटेलमध्ये आयोजित पोलीस पाल्यासाठी करिअर समुपदेशन आणि उच्चशिक्षण घेत असलेल्या पोलीस पाल्यांना शिष्यवृत्ती वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. आय.आय.टी. आणि मेडिकलचे शिक्षण घेणाºया २२ विद्यार्थ्यांना पोलीस विभागातर्फे प्रत्येकी २५ हजार रुपये आणि एनजीओकडून प्रत्येकी २५ हजार असे एकूण ५० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे यावेळी पोलीस महासंचालकांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. एनजीओतर्फे आयोजित राज्यातील पोलीस पाल्यांसाठी करिअर समुपदेशचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस (प्रशासन) महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, राज्य सरकारच्या गृहविभागाचे सीएसआर सल्लागार रामकृष्ण तेरकर, स्वयंसेवी संस्थेचे केतन देशपांडे यांची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी महासंचालक म्हणाले की, पोलिसाच्या मुलाने पोलीस कॉन्स्टेबल व्हावे, ही मानसिकता आता बदलली पाहिजे. पोलीस भरतीऐवजी मेडिकल, आयआयटी संस्था आणि अन्य उच्चशिक्षण देणाºया महाविद्यालयात पोलिसांच्या मुलांसाठी आरक्षण ठेवले तर पोलिसांची प्रतिमा उंचावेल. आज २२ मुलांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. पुढील वर्षी या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयआयटी, मेडिकलमध्ये शिकत असलेली जी मुले टॉपर येतील त्यांना एक लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा यावेळी महासंचालक माथुर यांनी केली.यावेळी अप्पर महासंचालक डॉ. सरवदे म्हणाल्या की, पोलिसांना ड्यूटीमुळे त्यांच्या कुटुंबियांकडे लक्ष देता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन पोलीस पाल्यांना जास्तीत जास्त सवलती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. विशेष पोलीस महानिरीक्षक भारंबे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस आयुक्त यादव यांनी शहर पोलिसांनी घेतलेल्या नोकरी मेळाव्यात पोलीस पाल्यांना आॅन दी स्पॉट रोजगार मिळाला. तो पॅटर्न राज्यभर राबविण्यात यावा, अशी विनंती केली.