शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत चो-या, घरफोड्या रोखण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:43 IST

पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर होणा-या चो-या, घरफोड्या रोखण्यात यावर्षी शहर पोलिसांना यश आले. जीपीएस मोबाईल गस्त आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी ठेवलेला वचक हे यामागचे गमक असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नमूद केले.दरवर्षी दसरा, दिवाळी उत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात चो-या, घरफोड्या होतात. यामुळे दिवाळीच्या सुटीत सहलीवर आणि गावी जाणा-या नागरिकांना घराच्या सुरक्षेबाबत सतत चिंता असते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी दीपोत्सवाच्या महिनाभर आधीच नियोजनबद्ध काम हाती घेतले. हे काम होते रेकॉर्डवरील चो-या, घरफोड्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याचे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शहरात आल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोक्का, स्थानबद्धता आणि तडीपारीसारख्या कारवाईचे आदेश दिले. हे आदेश प्राप्त होताच उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त विनायक ढाकणे यांनी त्यांच्या परिमंडळातील गुन्हेगारांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत प्रत्येक ठाण्यांतर्गत टॉप २० गुन्हेगारांचे मोबाईल नंबर घेऊन त्याना जीपीएसशी जोडण्यात आले होते. परिणामी कोणत्या वेळी कोणता गुन्हेगार कोठे होता आणि आहे याबाबतची सर्व माहिती पोलिसांना सहज उपलब्ध होते. यासोबतच जे चोरटे सक्रिय आहेत त्यांना कारागृहात बंद करण्यात आले. पोलिसांकडून कडक कारवाई सुरू झाल्यापासून अनेकांनी शहरातून मुक्काम हलविणेच पसंत केले. पोलिसांची गस्त नियमित आणि योग्य झाली अथवा नाही, याबाबतचा अहवाल रोजच्या रोज पोलीस आयुक्तांच्या टेबलवर जातो. या अहवालाच्या आधारे पोलिसांची एक जरी व्हॅन एकाच ठिकाणी उभी असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतचे उत्तर तात्काळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना विचारले जाते. यामुळे एखाद्या ठाण्याची गाडी नादुरुस्त झाली असल्यास मोटार वाहन कार्यशाळेतून तात्काळ दुसरी गाडी उपलब्ध केली जाते. यामुळे गस्त कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही. जीपीएस आधारित पोलिसांच्या गस्तदरम्यान कोणताही व्यक्ती संशयास्पद दिसल्यास त्याची विचारपूस होते. शिवाय चो-या, घरफोड्या टाळण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना करावी, याबाबतचे जागरण करणारे पत्रक पोलिसांकडून शहरात वाटण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले. परिणामी चो-या रोखण्यात आम्ही यशस्वी झालो.