शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पत्तेपंचमीला पोलिसांचा 'ब्रेक' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 19:26 IST

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे पंचमीला जुगार खेळण्याची जुनी परंपरा आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या मैदानावर जुगाराचा खेळ सुरु झाला. पण पोलिसांनी यावर छापा टाकत हा जुगार बंद पाडला.

ठळक मुद्दे खंडाळा येथे पंचमीला जुगार खेळण्याची जुनी परंपरा आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर जुगाराचा खेळ सुरु झाला. खेळ म्हणजे जुगार नव्हे हि एक परंपरा आहे अशी नागरिकांची भावना आहे.  पोलिसांनी यावर छापा टाकत हा जुगार बंद पाडला.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद /वैजापुर : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे पंचमीला जुगार खेळण्याची जुनी परंपरा आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या मैदानावर जुगाराचा खेळ सुरु झाला. पण पोलिसांनी यावर छापा टाकत हा जुगार बंद पाडला. नागरिकांनी मात्र पोलिसांच्या या विघ्नानंतरहि जागा बदलत पत्तेपंचमी साजरी करण्यावर भर दिला.

 पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नाग पंचमीला जुगार खेळण्याची कुप्रथा काही अंशी मोडीत निघाली आहे. यावेळी जुगा-यांनी पळ काढला असला तरी पोलिसांनी मैदानावरील त्यांच्या गाड्या  ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात लावल्या आहेत. मात्र, हा खेळ म्हणजे जुगार नव्हे हि एक परंपरा आहे अशी नागरिकांची भावना आहे. 

पत्ते पंचमीची परंपरा खंडाळा येथे पंचमीत  खेळल्या जाणाऱ्या जुगार या खेळाला खूप जुनी परंपरा आहे. हा खेळ म्हणजे जुगार नव्हे. पंचमीच्या आनंदात भर घालणारा तो मनोरंजनाचा एक प्रकार आहे, हे पटवून देत ही परंपरा कायम ठेवण्यासाठी येथे सर्व समाजातील जाणते लोकं प्रयत्न करताना दिसतात. जुगा-यांना पर्वणी ठरलेल्या पंचमीला पत्त्यांचे मोठे डाव येथे भरवण्यात येतात.यात झन्ना-मन्ना, एक्का-बादशाह, तिर्रट असे पत्त्यांचे खेळामध्ये पैसे लावून हजारो रुपयांचा जुगार खेळला जातो.  पहाटे पासूनच रंगलेल्या या खेळात तरुणांचा अधिक भरणा होता. 

कुप्रथा हद्दपार करण्यासाठी पोलिसांची कारवाई

ग्रामीण भागात पत्त्यांच्या खेळाची कुप्रथा रूढ झाली असून,ही प्रथा घातक आहे. या प्रथेला हद्दपार करण्यासाठी यंदा पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या आदेशा नुसार जिल्यातील सर्व पोलिस ठाण्याला कड़क सुचना देवून जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.