शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपाई जाळ्यात

By admin | Updated: May 17, 2017 00:43 IST

जालना : गुन्हा दाखल न करता तपास कामात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुन्हा दाखल न करता तपास कामात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाच मागणाऱ्या शिपायाचे नाव सचिन कमलाकर फड (वय २६, रा.पोलीस कॉलनी) असून, तो शहरातील कदीम पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.या प्रकरणातील तक्रारदाराकडे शिपाई सचिन फड याने परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्याबरोबर हर्सूल जेलमध्ये न पाठविण्यासाठी तीस हजारांची लाच मागितली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, ३१ जानेवारी २०१७ रोजी लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये शिपाई फड याने तक्रारदाराकडे तीस हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच लाचेची रक्कम आशीर्वाद हॉटेलमध्ये आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक तपासाअंती लाचलुचपत विभागाने मंगळवारी शिपाई सचिन फड याच्याविरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक व्ही.एल. चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, रामचंद्र कुदर, नंदू शेंडिवाले, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, म्हस्के, चालक थापा यांनी ही कारवाई केली.