शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

दारू दुकानांविरोधात पोलिसांचा अहवाल

By admin | Updated: July 7, 2017 01:17 IST

औरंगाबाद : नागरी वसाहतींमध्ये देशी-विदेशी मद्यांसह परमिटरूम्स स्थलांतरित करण्यासाठी होत असलेल्या हालचालींना वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नागरी वसाहतींमध्ये देशी-विदेशी मद्यांसह परमिटरूम्स स्थलांतरित करण्यासाठी होत असलेल्या हालचालींना वेग आला असून, नागरिकांनी त्या विरोधात लोकशाही मार्गाने हत्यार उपसले आहे. उल्कानगरी परिसरातील रेल्वेस्टेशन येथील देशी दारूचे दुकान (लायसन्स क्रमांक २१/२०१६-१७) स्थलांतरित होण्याबाबत जवाहरनगर पोलिसांनीदेखील परवाना दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे मत गोपनीय अहवालात नमूद आहे. लोकमतने ६ जूनच्या अंकामध्ये ‘आता नागरी वसाहतींमध्ये चिअर्स’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून एन-२, उल्कानगरी आणि जयभवानीनगर येथील प्रकरणे उघडकीस आणली. या वृत्ताची दखल जवाहरनगर पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने लायसन्स स्थलांतर मागणीचा प्रस्ताव चौकशीविना मंजूर न करण्याचा निर्णय घेतला आहे. मालखरे क्लासिक, शिवनेरीनगर, उल्कानगरी, गारखेडा परिसर येथील दुकान स्थलांतरित करण्यासाठी परवानगी देण्यास जवाहरनगर पोलिसांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्या इमारतीत देशी दारूचे दुकान येणे सध्या तरी शक्य दिसत नाही. नागरिकांनी दाखविलेल्या एकजुटीचा आणि लोकमतने त्याला वाचा फोडल्यामुळे हे शक्य झाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. सदरील देशी दारू दुकानास नागरिकांचा विरोध असून नगरसेविका जयश्री कुलकर्णी, दिलीप थोरात, अर्चना नीळकंठ यांनीदेखील याबाबत विरोध दर्शविला आहे. उच्चभू्र वसाहत आणि धार्मिकस्थळ असल्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी गोपनीय अहवालात नमूद केले आहे. कामगार चौक ते जयभवानीनगरमार्गे पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते सूतगिरणी हा पूर्ण रस्ता ‘लिकर रोड’ म्हणून पुढे येतो आहे. नागरी वसाहतींमधून जाणाऱ्या रस्त्यांवर मद्य विक्रीची दुकाने स्थलांतरित होऊ नयेत, यासाठी नागरिक एकवटले आहेत.