हिंगोली : शहरातील संत नामदेव पोलिस कवायत मैदान येथे २९ मार्च रोजी पोलिस भरती होणार आहे. यावेळी होणाऱ्या भरती प्रक्रियेत उमेदवाराने कुठल्याही आमिषाला बळी न पडता दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी केले आहे. सदर पोलिस भरती प्रक्रियेच्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून चोख बंदोबस्त राहणार आहे. पोलिस भरती पारदर्शकपणे पार पाडली जाणार असून उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता स्वत:ची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच यावेळी दलाल किंवा कोणती संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
मंगळवारपासून पोलिस भरती
By admin | Updated: March 27, 2016 23:49 IST