लातूर शहरातील सराफा बाजारातील सुरक्षेसाठी लोकसहभागातून मोठा गाजावाजा सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे बाजारातील अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मात्र या सर्वात मोठ्या दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. बुधवारी दरोड्याच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेण्यात आली. दिवसभर सराफा बाजारातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस यंत्रणेने तपासले. मात्र पोलिस यंत्रणेच्या हाती काहीच लागले नाही. दरोडेखोरांनी अत्यंत चलाखीने हा सशस्त्र दरोडा टाकला असून, हा दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी या परिसराचा बारकाईने अभ्यास केला असावा. सातत्याने अलिकडे लातूर शहरासह जिल्हाभरात जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश घटनांचा शोध पोलिसांना लावता आला नाही. काही घटनांमधील अज्ञात दरोडेखोरांची रेखाचित्रे जारी केली जातात. त्यानंतरचा तपास मात्र शून्यावर असतो. एकंदरित, पोलिस प्रशासनाची निष्क्रियता अशा गंभीर गुन्ह्यांना कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. सराफा बाजारातील गस्त वाढविण्याची गरज आहे. दुकानांतील सीसीटीव्ही कॅमेरे सक्षम करणार असल्याची माहिती विश्वनाथ किनीकर यांनी दिली.
पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज
By admin | Updated: December 9, 2015 23:54 IST