औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी हिमायतबाग येथे अतिरेक्यांच्या एन्काऊंटरमुळे चर्चेत आलेले पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे हे आता इंडियन मुजाहिद्दीनच्या (आयएम) ‘टार्गेट’वर असल्याचे समोर आले आहे. पूर्वी औरंगाबाद एटीएसमध्ये कार्यरत असलेले ठाकरे सध्या येथे गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांच्या हत्येचा ‘आयएम’ने कट रचल्याचे उघडकीस आले आहे. मार्च २०१२ मध्ये काही तरी घातपाताच्या उद्देशाने आलेल्या इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेच्या अतिरेक्यांची आणि एटीएसची औरंगाबादेतील हिमायतबाग परिसरात चकमक उडाली होती. या चकमकीत अजहर कुरैशी (रा. इंदौर) हा एक अतिरेकी ठार झाला होता, तर आयएमचा अन्य एक सदस्य जखमी झाला होता. शिवाय, एटीएस पथकातील जमादार शेख आरेफही गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले होते. या कारवाईत जिवंत पकडल्या गेलेल्या अतिरेक्याकडून अनेक कटांचा त्यावेळी उलगडा झाला होता. शिवाय, या संघटनेचे अन्य काही अतिरेकीही पकडल्या गेले होते. औरंगाबाद एटीएसच्या या कारवाईमुळे आयएमला मोठा झटका बसला होता. आयबीचाही अलर्टआता पुन्हा एकदा इंडियन मुजाहिद्दीनने त्यांचा अटकेत असलेला प्रमुख अबू जिंदाल याच्या सुटकेसाठी योजना आखल्याचा आणि त्याबरोबरच आपल्या साथीदाराचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ठाकरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. हिमायतबाग येथील एन्काऊंटरपासूनच आपण आयएमच्या टार्गेटवर असल्याचे ठाकरे म्हणाले. आयबी व एटीएसने यापूर्वीच आपल्याला अलर्ट दिलेला आहे, असेही ठाकरे यांनी सांतिगले. आधीच दिली होती धमकी!या टोळीचेच काही सदस्य अहमदबाद एटीएसने अटक केले होते. त्यांच्या तपासासाठी शिवा ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह गेले होते. त्यावेळी पकडला गेलेला अतिरेकी डॉ. अबू फजल याने ठाकरे यांना तोंडावर ‘हम तुम्हे छोडेंगे नही, उडाने वाले हैं,’ अशी धमकी दिली होती.
पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर !
By admin | Updated: October 12, 2014 00:31 IST