शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात घरघर!

By admin | Updated: August 18, 2016 00:53 IST

जालना : वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माच महिन्यात सुरू करण्यात आलेल्या पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने बाब समोर आली आहे

जालना : वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माच महिन्यात सुरू करण्यात आलेल्या पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने बाब समोर आली आहे. गत पाच महिन्यांत केवळ सातच तक्रारी नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी तत्त्कालीन पोलिस महासंचालक प्रविणकुमार दीक्षित यांच्या संकल्पनेतून पोलिस मित्र अ‍ॅप राज्यभर लाँच करण्यात आला. ज्या ठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. तेथे हा अ‍ॅप सुरु करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने डिजीटल इंडियांतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अ‍ॅप लाँच केला होता. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. अ‍ॅपद्वारे नोंदविलेल्या तक्रारींसाठी संगणकाचे ज्ञान असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ज्यांना मदतीची तात्काळ गरज आहे अशांसाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. गत पाच महिन्यांत केवळ सातच तक्रारी पोलिस नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचेही निरसन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिस प्रशासनाने या अ‍ॅपबाबत जनजागृती केल्यास नागरिकांना या अ‍ॅपचे महत्व पटून नागरिक अ‍ॅपच्या वापराकडे वळतील असेही मोबाईलधारकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. परिणामी सध्या या कक्षातील कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. सध्या या अ‍ॅपवर तक्रारी येतच नसल्याचे सांगण्यात येत असल्याने ते बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)