शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा हवेत गोळीबार

By admin | Updated: February 22, 2016 00:39 IST

तामलवाडी : आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या सोलापूर पोलिसांच्या पथकावर संतप्त जमावाने तलवारी, काठ्या, दगडं घेऊन पाठलाग सुरू केल्याने स्वसंरक्षणासाठी

तामलवाडी : आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या सोलापूर पोलिसांच्या पथकावर संतप्त जमावाने तलवारी, काठ्या, दगडं घेऊन पाठलाग सुरू केल्याने स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला़ ही घटना शुक्रवारी दुपारी वडगाव (काटी़ ता़तुळजापूर) येथे घडली असून, या प्रकरणी १२ जणाविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या फौजार चावडीचे पोलीस पथक गुरनं १०९/१२ नुसार कलम ३०७ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शिवलाल सरदार काळे याला शोधण्यासाठी शुक्रवारी दुपारी वडगाव (काटी) शिवारातील पारधी वस्तीवर गेले होते़ मात्र, पथकातील तीन पोलीस अधिकारी, कर्मचारी पाहताच वस्तीमधील नागरिकांनी कुऱ्हाड, तलवार, दगड घेऊन ‘आता यांना जीवे मारून टाकू’ असे म्हणत पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाठलाग सुरू केला़ जमाव हत्यारासह पाठलाग करीत असल्याने पोलिसांनी हवेत दोन फैरी झाडल्या़ पोलिसांनी हवेत गोळीबार करताच जमाव तेथून पांगला़ त्यानंतर पोलिसांनी हरिष शामराव काळे व प्रल्हाद दगडू काळे (रा़ वडगाव काटी) या दोघांना ताब्यात घेतले़ याबाबत सोलापूर पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवलाल सरदार काळे (रा़ कारंबा ता़उत्तर सोलापूर) हरिश शामराव काळे, प्रल्हाद दगडू काळे (रा़ वडगाव काटी) यांच्यासह १२ जणाविरुद्ध रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोउपनि सुरेश शिंदे हे करीत आहेत़ दरम्यान, ताब्यातील हरिष शामराव काळे व प्रल्हाद दगडू काळे (रा़ वडगाव काटी) या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़एकच पुंगळी सापडलीसोलापूर पोलीस ठाण्यातील पथकातील शिवाजी नाईक या अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी हवेत दोन गोळ्या झाडल्या़ घटनेनंतर तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़ त्यावेळी गोळीबारातील एकाच गोळीची पुंगळी मिळाली़ त्यामुळे अनेक प्रश्न समोर येत आहेत़ तर गोळीबार करण्याची परिस्थिती नसताना, या वस्तीवरील एकावरही पाच वर्षात कोणताही गंभीर गुन्हा तामलवाडी ठाण्यात नाही़ (वार्ताहर)