नवीन नांदेड : जुना कौठा भागातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या २९ वर्षीय पोलिस शिपाई संदीप जळबाजी कोमावाड यांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी जुना कौठा परिसरातील साईबाबा मंदिराच्याशेजारी गोदावरी नदीत घडली. सिडको एन. डी-१, शिवाजी चौक परिसरातील रहिवासी अशोक दत्तराव सुर्वे व त्यांचे मित्र कोमावाड (रा.क्रांतीचौक,सिडको,नांदेड) हे दोघे २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जुना कौठा परिसरातील साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. दर्शनानंतर ते दोघे जण थोडावेळ साई मंदिराच्या पायऱ्यावर बसले. दरम्यान, कोमावाड हे अंघोळ करतो, असे म्हणून पायऱ्यावरून गोदावरी नदीचे पात्रात गेले. त्यावेळी, गोदावरीच्या पात्रात बुडून कोमावाड यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस जमादार सुरेश वाघमारे व ठाणे अंमलदार तथा सहायक पो.उपनि. व्ही. व्ही. मुंडे यांनी दिली. याप्रकरणी अशोक दत्तराव सुर्वे यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुरेश वाघमारे व पोकॉ. बोडके तपास करीत आहेत. (वार्ताहर)
पोलिस शिपायाचा नदीत बुडून मृत्यू
By admin | Updated: August 24, 2014 00:38 IST