शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पोलीस आयुक्तांची कार रोखणाऱ्यास ६ महिने कारावास

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

औरंगाबाद : गस्तीवर असलेल्या पोलीस आयुक्तांची कार अडवून हुज्जत घालणाऱ्या तरुणाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

औरंगाबाद : गस्तीवर असलेल्या पोलीस आयुक्तांची कार अडवून हुज्जत घालणाऱ्या तरुणाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. अमोल भावराव खरात (३०,रा. किलेअर्क) अशी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त २६ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गस्तीवर होते. ते शासकीय कारने (क्रमांक एमएच-२० एएस-७६७६) किलेअर्कमधून जात असताना अमोल हा अचानक त्यांच्या कारसमोर आडवा झाला. यावेळी त्याने त्यांच्या कारच्या खिडकीवर जोराने मारून काच फोडली आणि तो आरडाओरड करू लागला. यावेळी पोलीस आयुक्तांसोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले आणि सिटीचौक पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी उद्धव किसन गीते यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोेलिसांनी तपास करून आरोपीच्या विरोेधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांच्यासमोर झाली असता सहायक सरकारी वकील अ‍ॅड. शोभा विजयसेनानी यांनी ३ साक्षीदार तपासले. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला मालमत्ता विद्रुपीकरण केल्याच्या आरोपाखाली सहा महिने कारावास, भादंवि १८६ कलमाखाली ३ महिने कारावास आणि कलम ३४१ नुसार १ महिना साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली.