औरंगाबाद : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना राहत्या घराचे जून महिन्याचे वीजबिल चक्क १ युनिट आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंपनीचे अधिकारी पोलीस आयुक्तांचे विद्युत मीटर फॉल्टी आहे का इतर काही त्रुटी आहेत, याचा तपास करीत आहेत. शहरातील मिलकॉर्नर येथील पोलीस आयुक्तांच्या बंगल्याचे जून महिन्याचे वीजबिल १ युनिट आल्यामुळे त्याबाबतची तक्रार महावितरणकडे करण्यात आली होती. तक्रारीनुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मीटरच्या रीडिंगची गेल्या काही महिन्यांची सविस्तर माहिती काढली असता त्यामध्ये आणखीनच गडबड असल्याचे समोर आले आहे. जूनचे १ युनिटचे बिल तर त्यापूर्वी कधी २३ युनिट तर कधी शंभरपेक्षा अधिक युनिट वीज वापरल्याचे समोर आले. त्यामुळे विद्युत मीटरमध्ये काही गडबड आहे की इतर काही त्रुटींमुळे चुकीचे बिल देण्यात आले आहे, याचा तपास महावितरणकडून करण्यात येत आहे. जून महिन्याचे १ युनिटचे वीजबिल ६६ रुपये आणि मागील महिन्यांची थकबाकी मिळून जवळपास साडेआठ हजार रुपये बिल पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांना १ युनिटचे वीजबिल
By admin | Updated: August 4, 2015 00:37 IST