शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

पोलीस चौक्या बेवारस

By admin | Updated: June 23, 2014 00:32 IST

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांवर कर्मचारी थांबतच नसल्याने त्या बेवारस झाल्या आहेत

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांवर कर्मचारी थांबतच नसल्याने त्या बेवारस झाल्या आहेत, तर काही चौक्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक परिसरात चोऱ्या व लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महानगराचा वाढता विस्तार पाहता एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकीत कर्मचारी थांबत नसल्यामुळे चौक्या रात्रीच्या वेळी तळीरामांचे आश्रयस्थान बनत चालल्या आहेत. बजाजनगर, सिडको वाळूज महानगर-१, पंढरपूर, रांजणगाव येथे उभारण्यात आलेल्या चारही पोलीस चौक्या बंद आहेत. काही चौक्यांवर पोलीस अधूनमधून काही काळ थांबून निघून जातात. सिडको वाळूज महानगर-१ मधील पोलीस चौकी तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक दिवसांपासून धूळखात तशीच पडून आहे. या चौकीचा रहिवाशांना काहीच उपयोग होत नाही. त्यामुळेच महानगरात चोऱ्या, लुटमारीचे प्रकार वाढत चालले आहेत. मोहटादेवी मंदिर, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर या चौक्यांवर मवाली स्वरूपाच्या तरुणांचा वावर वाढला आहे. पोलीस नसल्याने तरुणांचे टोळके मंदिराच्या परिसरात बसलेल्या, थांबलेल्या महिला- युवतींची छेड काढत असतात. मोहटादेवी मंदिर परिसरात कामाच्या शोधात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील दाम्पत्याला नुकतेच मारहाण करून लुटले आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील पोलीस चौक्या नावालाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सिडको वाळूज महानगर-१ मधील पोलीस चौकीच्या आजूबाजूला काटेरी झाडेझुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खिडक्या, टेबल, तुटलेले आहेत. तसेच शेजारीच नागरिक कचरा टाकत असल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. चौकीवर पोलिसांची ये-जा नसल्याने भुरट्या चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. या परिसरात चोऱ्या व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक क्षेत्राचा विस्तार वाढला आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे दूर असल्याने नागरिकांच्या छोट्या-मोठ्या तक्रारी सोडविता याव्यात, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रांजणगाव, बजाजनगर, सिडको वाळूज महानगर-१, पंढरपूर, शेंदुरवादा आदी भागांत पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली; परंतु चौक्याच बेवारस झाल्याने या भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात जावे लागते.