शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम प्रकरणात मनपात धडकले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:56 IST

इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनमध्ये फेरफार करुन देतो त्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करणाºया तरुणाला मंगळवारी पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर या प्रकरणात महापालिकेतही पोलिसांनी दिवसभर चौकशी केली.

ठळक मुद्देमनपात चौकशी : निवडणूक धामधुमीत काहींंचा कानाडोळा; काहींना इंग्रजीतील ‘एसएमएस’ समजलाच नाही

नांदेड :महापालिका निवडणुकीवेळी सचिन दत्ता राठोड (रा. दयाळ धानोरा ता. किनवट) सध्या शहरातील सुंदरनगर येथे राहत असलेल्या तरुणाने काही उमेदवारांना मोबाईलवरुन मेसेज पाठवून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देतो, यासाठी १० लाख रुपये अगोदर आणि निकालानंतर ५ लाख रुपये द्या, अशी आॅफर असलेले मेसेज मोबाईलवर पाठविले होते. १५ लाखांत मतदान यंत्रात फेरफार करुन विजयी केले जाईल, अशा आशयाचा तो एसएमएस होता. चोरीचे सीमकार्ड वापरुन हिमाचल प्रदेश निवडणूक आयोगाच्या नावेही हिमाचल प्रदेशातील ४३ जणांना मेसेज पाठविले होते. तिथेही मतदान यंत्रात फेरफार करुन उमेदवारांना विजयी करण्याचे आमिष दाखविले होते. याप्रकरणी हिमाचल प्रदेशात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात मोबाईलचे लोकेशन तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातील दाखविले होते. या प्रकरणाची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी नांदेड पोलिसांनाही दिली होती. यावरुन नांदेड पोलिसांनी सचिन राठोड याला ताब्यात घेतले. सचिन राठोड याने ज्या ज्या उमेदवारांना मेसेज पाठविले त्यांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. महापालिका निवडणूक विभागाचे प्रमुख असलेल्या मनपा आयुक्तांना मंगळवारी पोलिसांनी सदर प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणात कायदेशीर बाबी तपासल्या जाव्यात, असे आयुक्तांनी पोलिसांशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. प्राप्त माहितीनुसार, महापालिकेतील अनेक उमेदवारांनी मोबाईलवरील हे मेसेज पाहिलेच नाहीत. तर काहींनी इंग्रजीतील हे मेसेज पाहिले, परंतु त्यांना त्याचा अर्थ समजला नसल्याने त्यांनीही कानाडोळा केला. मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी मंगळवारी पहाटेपासूनच आपला मोर्चा संबंधित उमेदवारांकडे वळवला होता. यातील काहींना पहाटेच ताब्यात घेवून चौकशी केल्याचेही सूत्रांनी सांगितले. महापालिकेतही पोलिसांचे एक पथक मंगळवारी दिवसभर चौकशीत होते. या मेसेज प्रकरणाची माहिती पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यातही ते ३१ उमेदवार कोणते याचीही उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. यातील किती उमेदवार निवडून आलेत याची चर्चा दिवसभर सुरू होती.दरम्यान, नांदेड पोलिसांनी जेरबंद केलेल्या सचिन राठोड बाबत हिमाचल प्रदेशातील शिमला पोलिसांंना माहिती दिली असून शिमला पोलीस एक ते दोन दिवसांत नांदेडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी दिली़ दरम्यान, आरोपी राठोड याने इस्लापूर येथे सीम चोरी केले होते़ त्या प्रकरणात इस्लापूर ठाण्यात त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोनि़ संदीप गुरमे यांनी दिली़